Lok Sabha Election 2019; जीएसटीच्या कक्षेत निवडणूक खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:17 PM2019-03-26T22:17:34+5:302019-03-26T22:18:46+5:30

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खाद्यपदार्थ वगळता इतर निवडणूक खर्च जीएसटीसह देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रत्यक्षात अधिक खर्च झालेला असतानाही कमी खर्च दाखविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2019; Election expenses under the GST | Lok Sabha Election 2019; जीएसटीच्या कक्षेत निवडणूक खर्च

Lok Sabha Election 2019; जीएसटीच्या कक्षेत निवडणूक खर्च

Next
ठळक मुद्देअतिरिक्त खर्चाला चाप : नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पथक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खाद्यपदार्थ वगळता इतर निवडणूक खर्च जीएसटीसह देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रत्यक्षात अधिक खर्च झालेला असतानाही कमी खर्च दाखविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे.
लोकसभेसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा आहे. मात्र अनेक ठिकाणी या मर्यादेचा भंग होतो. तसेच काही उमेदवार दुप्पट- तिप्पट चौपट पैसे प्रत्यक्षात खर्च करतात. निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये समोर आले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करण्यापूर्वी काही उमेदवार तज्ज्ञ लेखापरीक्षकांच्या मदतीने खर्च अधिक झालेला असतानाही तो कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र यावेळी असे करणे अडचणीचे ठरणार आहे. शाकाहारी, मासाहारी जेवण, चहा, नास्ता वगळून इतर सर्व निवडणूक खर्चावर जीएसटी भरावा लागेल. जीएसटीच्या पावत्या जोडाव्या लागतील. त्यामुळे कमी किमतीची किंवा बनावट पावती घेता येणार नाही. या पद्धतीचा त्रास निवडणुकीत पैसे उधळणाऱ्यांना उमेदवारांना होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत खाद्य, पेय वेगळता इतर खर्चाच्या जीएसटीसह पावत्या उमेदवारांना खर्च सादर करताना जोडणे आवश्यक आहे. यासह खर्चाच्या इतर बाबींवर नियंत्रण ठेवण्याची स्वतंत्र पथक कार्यरत आहेत.

Web Title: Lok Sabha Election 2019; Election expenses under the GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.