Lok Sabha Election 2019; जनजागृती पथनाट्य व फिरते चित्ररथ प्रदर्शन जिल्ह्यात रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:17 PM2019-04-08T23:17:54+5:302019-04-08T23:18:22+5:30

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली.

Lok Sabha Election 2019; Janjagruti Pathatattya and Firte Chitratha showcase in the district | Lok Sabha Election 2019; जनजागृती पथनाट्य व फिरते चित्ररथ प्रदर्शन जिल्ह्यात रवाना

Lok Sabha Election 2019; जनजागृती पथनाट्य व फिरते चित्ररथ प्रदर्शन जिल्ह्यात रवाना

Next
ठळक मुद्देपथनाट्यातून मतदानाविषयी करणार जागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली.
जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार तसेच चंद्रपूर मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक दीपांकर सिन्हा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय आउटरीच ब्यूरो, फील्ड आॅडिट ब्यूरो वर्धा, निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या स्वीप मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील काही रहदारीची ठिकाणे व मागील निवडणुकीत जिथे मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा ३५ ठिकाणांची निवड करून मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या राष्ट्रीय महोत्सवात १८ वर्षावरील सर्व मतदार मतदान करण्यासाठी सज्ज असणार आहेत. सर्वांनीच मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अनेक जागी लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. प्रलोभनांना नागरिकांनी बळी पडू नये, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारा मतदार जनजागृतीकरिता विशिष्ट पद्धतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. चंद्रपूर, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या ३५ ठिकाणांची निवड करून त्याजागी चित्ररथ सर्वत्र फिरवून त्याद्वारे मतदानाचा संदेश दिला जात आहे. या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी ( प्राथ.) दीपेंद्र लोखंडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके तसेच मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Lok Sabha Election 2019; Janjagruti Pathatattya and Firte Chitratha showcase in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.