Lok Sabha Election 2019; दीड हजार सैनिक बजावणार लोकसभा मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:20 PM2019-03-27T22:20:45+5:302019-03-27T22:21:36+5:30

लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा गावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक चौकाचौकांत जणू निवडणुकीचे विश्लेषणणच सुरू असल्याचे चित्र आहे. असे असले तरी उमेदवार मतदारांची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदारांपैकी १ हजार ५५६ सैनिक मतदार असून ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे.

Lok Sabha Election 2019; Right to Lok Sabha election to play 1.5 thousand soldiers | Lok Sabha Election 2019; दीड हजार सैनिक बजावणार लोकसभा मतदानाचा अधिकार

Lok Sabha Election 2019; दीड हजार सैनिक बजावणार लोकसभा मतदानाचा अधिकार

Next
ठळक मुद्दे१३ महिला सैनिकांचा समावेश : चंद्रपूर क्षेत्रात सर्वाधिक सैनिक मतदार

साईनाथ कुचनकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा गावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक चौकाचौकांत जणू निवडणुकीचे विश्लेषणणच सुरू असल्याचे चित्र आहे. असे असले तरी उमेदवार मतदारांची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदारांपैकी १ हजार ५५६ सैनिक मतदार असून ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे.
विधानसभानिहाय सैनिक मतदारांची संख्या लक्षात घेतली, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे, ३७७ तर आर्णी विधानसभा मतदार संघात सर्वात कमी १३० सैनिक आपला अधिकार बजावणार आहेत.
लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी निवडणूक प्रचाराला मिळणार आहे. या कालावधीमध्ये त्यांना लोकसभा क्षेत्रातील तब्बल १ हजार ८०० गावांना भेटी द्याव्या लागणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १८ लाख ९१ हजार ४४४ मतदार असून ९ लाख ८८ हजार ९०४ पुरुष मतदार, ९ लाख १२ हजार ५२६ महिला मतदारांची नोंद आहे. यामध्ये १४ तृतीयपंथी मतदार आहे. विशेष म्हणजे, लोकसभा क्षेत्रामध्ये १ हजार ५५६ सैनिक मतदार असून यातील १३ महिला सैनिक मतदार आहेत.
विधानसभा मतदार संघानुसार सैनिक मतदारांमध्ये आर्णी विधानसभा क्षेत्रात- १३०, वणी- १३४, वरोरा-३४३, बल्लारपूर- २९३, राजुरा-१७९ सैनिक मतदार आहे. यामध्ये सर्वाधिक चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ३७७ मतदार सैनिक आहे. महिला सैनिकांमध्येही चंद्रपूरची संख्या सर्वाधिक आहे. वरोरा, वणी, विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक एक महिला सैनिक मतदार आहे. आर्णीमध्ये दोन, राजुरामध्ये ४ तर चंद्रपूर मध्ये ५ महिला मतदार सैनिक मतदान करणार आहे. विशेष म्हणजे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकही महिला सैनिक नाही.विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच २२ हजार ९६५ मतदार आपला हक्क बजावणार आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार आर्णी विधानसभा क्षेत्रातील आहेत.
१४ तृतीयपंथी करणार मतदान
चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदारांपैरकी केवळ १४ तृतीयपंथी मतदार आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ११ जणांचे मतदार यादीत नाव असून आर्णी विधानसभा क्षेत्रात ३ जणांनी नोंदणी केली आहे. राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी विधानसभा क्षेत्रामध्ये एकाही तृतीयपंथी मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही.

Web Title: Lok Sabha Election 2019; Right to Lok Sabha election to play 1.5 thousand soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.