Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:24 AM2019-03-31T00:24:14+5:302019-03-31T00:25:38+5:30

चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, ...

Lok Sabha Election 2019; Verbal war of key candidates | Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

Lok Sabha Election 2019; प्रमुख उमेदवारांचे शाब्दिक युद्ध

Next
ठळक मुद्देलोकसभेचा आखाडा : पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याबरोबर काँग्रेसच्या उमेदवाराकडून भाजप उमेदवारावर आरोपाचे बाण सोडण्यात आले, तर भाजप उमेदवाराने विकासाची गाथा वाचून आरोपाचे खंडन करतानाच भाजपची उमेदवारी घरबसल्या येते, तर काँग्रेसच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जावून भीक मागावी लागते, अशा शब्दात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू झाले आहे. या आरोपांमुळे निवडणुकीला वेगळे वळण येत असले तरी मतदार हे आरोप किती गांभिर्याने घेतात हे बघण्यासारखे आहे.

न केलेल्या कामांचेही श्रेय लाटतात या क्षेत्राचे खासदार- सुरेश धानोरकर
चंद्रपूर : काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत भाजप उमेदवार हंसराज अहीर यांच्यावर थेट आरोप केले. चंद्रपूर मतदार संघाचा २० वर्षांपासून विकास झाला नाही. ६० हजार लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री सांगत आहेत. खासदार या नात्याने एकही उल्लेखनीय काम केले नाही. या पूर्वीच्या निवडणुकीत तिरंगी लढती झाल्याने ते निवडणूक जिंकत आले आहे. ते युतीचे खासदार असताना त्यांच्याकडून नेहमीच सापत्न वागणूक मिळाली. परिणामी युतीचा आमदार असतानाही आंदोलने करावी लागली, अशी टीकाही धानोरकर यांनी यावेळी केली. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी केलेली युती पटली नाही. आधी आरोप करायचे आणि नंतर एकत्र यायचे हे पटले नाही. आपण अस्वस्थ झालो. लोकसेवा करायची म्हणून शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसने काही गटाचा विरोध असतानाही तिकीट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी बोलून तिकीट मिळूवन दिली.

भाजपमध्ये घरबसल्या तिकीट येते काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते - हंसराज अहीर
चंद्रपूर : भाजपामध्ये विकासकामे व पक्षनिष्ठेच्या आधारावर निवडणुकीची उमेदवारी मिळते तर काँग्रेसमध्ये भीक मागावी लागते, असा प्रहार भाजपा उमेदवार हंसराज अहीर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेतून केला. मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झालीत. या जोरावरच उमेदवारी दिली. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे जावून भाजपाचा ए.बी. फॉर्म आणला आणि तो आपणाला घरी आणून दिला. काँग्रेसच्या तिकीटासाठी दिल्लीत भीक मागावी लागते. भाजपमध्ये तिकीट घरी येते, अशा शब्दात अहीर यांनी काँग्रेसवर पलटवार केला. याप्रसंगी ना. मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे १९५१-५२ कालखंडातील प्रश्न आजही पुढे करीत आहे. यात काँग्रेसचे यश की अपयश हे जनतेने ठरावे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जातीवर आधारित मतदान होत नाही. जनता विकासावर मतदान करते. भाजपाचे हेच धोरण आहे असून आम्ही देशासाठी मत मागतो, असा टोलाही ना. मुनंगटीवार यांनी यावेळी हाणला.

Web Title: Lok Sabha Election 2019; Verbal war of key candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.