चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 01:36 PM2024-04-20T13:36:09+5:302024-04-20T13:36:35+5:30
Lok Sabha Elections 2024 : उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असताना सुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.
शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे.
यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.