‘लोकमत’ सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:06 PM2018-08-01T23:06:11+5:302018-08-01T23:06:31+5:30

दैनिक ‘लोकमत’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र आहे. लोकमत जनसामान्यांची समस्या सोडविण्यास नेहमी तत्पर असते. लोकमततर्फे महिला, युवक आणि बालकांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसत आहे. लोकमतने काढलेली समृद्ध वाटचाल ही पुरवणी राजुरा तालुक्याच्या विकासावर भर टाकणारी आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

'Lokmat' newspaper that gives justice to the general public | ‘लोकमत’ सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र

‘लोकमत’ सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र

googlenewsNext
ठळक मुद्देहंसराज अहीर : समृद्ध वाटचाल पुरवणीचे विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : दैनिक ‘लोकमत’ हे सामान्य जनतेला न्याय देणारे वृत्तपत्र आहे. लोकमत जनसामान्यांची समस्या सोडविण्यास नेहमी तत्पर असते. लोकमततर्फे महिला, युवक आणि बालकांसाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी कार्य करताना दिसत आहे. लोकमतने काढलेली समृद्ध वाटचाल ही पुरवणी राजुरा तालुक्याच्या विकासावर भर टाकणारी आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
राजुरा विश्रामगृहात लोकमतच्या समृद्ध वाटचाल पुरवणीचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेशाम अडानिया, माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत गुंडावार, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सतीश धोटे, राजुरा भाजपा शहर अध्यक्ष बेले, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहन कलेगूरवार, माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, जिवतीचे नगराध्यक्ष पूष्पा नैताम, महेश देवकते, वाघू गेडाम, मार्निंग गृपचे अध्यक्ष मसुद अहमद, राजू घरोटे, अ‍ॅड. प्रशांत घरोटे, महादेव तपासे, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख रिझवी, लोकमतच वार्ताहर इर्षाद शेख, सतीश शिंदे, रवींद्र ठमके, प्रवीण मेकर्तीकर, शंकर मडावी, प्रकाश काळे, सर्वांनंद वाघमारे, फारुख शेख, एजाज अहमद, अविनाश दोरखंडे, ज्ञानेश्वर गंडाखे उपस्थित होते.
संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी आभार आनंद भेंडे यांनी मानले.

Web Title: 'Lokmat' newspaper that gives justice to the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.