भद्रावतीत १६ ज़ुलैला लोकमत रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:21+5:302021-07-15T04:20:21+5:30

रक्तदान करण्याचे 35 संघटनांचे आवाहन भद्रावती : लोकमत वृत्तपत्र समूह व रोटरी क्लब, भद्रावती तसेच भद्रावती येथील विविध ३५ ...

Lokmat Raktadan Mahayagya on 16th July in Bhadravati | भद्रावतीत १६ ज़ुलैला लोकमत रक्तदान महायज्ञ

भद्रावतीत १६ ज़ुलैला लोकमत रक्तदान महायज्ञ

Next

रक्तदान करण्याचे 35 संघटनांचे आवाहन

भद्रावती : लोकमत वृत्तपत्र समूह व रोटरी क्लब, भद्रावती तसेच भद्रावती येथील विविध ३५ संस्था व मंडळे यांच्यावतीने लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भद्रावती येथे १६ जुलैला सकाळी १० वाजता ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

तहसीलदार महेश शितोळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, ठाणेदार सुनीलसिंग पवार, न. प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत.

रक्तदानाच्या या महायज्ञाला पोलीस ठाणे, भद्रावती, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, गुरुदेव सेवा मंडळ, भद्रावती पत्रकार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भद्रनाग युथ फाऊंडेशन, लोकमत सखी मंच, इनरव्हील क्लब, बॅडमिंटन क्लब, जोश क्रिकेट ॲकॅडमी, भद्रावती क्रिकेट क्लब, इलेव्हन स्टार क्रिकेट क्लब, भद्रावती वॉरियर्स, नवोदय स्पोर्टिंग क्लब, युवक स्पोर्टिंग क्लब, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती शिक्षण संस्था, स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, आस्था दाई समाज मंडळ, धनोजे कुणबी, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय जनसेवा पक्ष, इको प्रो संघटना, हॅपी क्लब, चंद्रपूर ऑफ स्टॅटीसकल व गायनाकलोजी सोसायटी, झाडीबोली साहित्य मंडळ, पोलीसपाटील संघटना इत्यादी संस्था व मंडळांनी सहभाग दर्शविला आहे. अधिक माहितीसाठी प्रा. सचिन सरपटवार, विनायक येसेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Lokmat Raktadan Mahayagya on 16th July in Bhadravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.