लोकमतची लेखमाला ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:44 PM2017-08-28T23:44:53+5:302017-08-28T23:45:10+5:30
लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील मालिकेतून विद्यार्थ्यांना अध्यावत ज्ञान मिळत असून....
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील मालिकेतून विद्यार्थ्यांना अध्यावत ज्ञान मिळत असून ही मालिका ग्रामीण विद्यार्थ्यांना सजीवनी ठरत आहे. असे प्रतिपादन डॉ. कार्तिक शिंदे यांनी केले.
स्थानिक डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात ‘प्रशासकीय सेवेतील सूवर्ण संधी’ व लोकमत प्रा. लि. आणि युनिक अॅकाडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने सघडावा तुमचे युनिक भविष्य’ या लेखमालेच्या प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भद्रावती शिक्षण संस्थेचे डॉ. कार्तिक शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावती पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, कृषी संचालनालय महाराष्टÑ शासनेचे निवृत्त संचालक रामभाऊ बळी, यशवंतराव शिंदे क. महा. चिचोर्डीचे प्राचार्य जयंत वानखेडे, प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पीएसआय महेंद्र इंगळे म्हणाले, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व अभ्यासातीत सातत्य मानसाला यशोशिखरावर पोहचवू शकते. तसेच लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक करत या लेखमालेचा फायदा घेऊन यशस्वी अधिकारी होण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या बारकाव्यांचे मार्गदर्शन केले.
तर निवृत्त संचालक (कृषी संचालनालय) रामभाऊ बळी यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी चौकस राहून ज्ञानार्जन केले पाहिजे. असे मार्गदर्शन केले. आपली पात्रता व सामर्थ्य सिद्ध करताना लोकमत स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला संग्रही ठेवण्याचा सल्ला दिला. प्रशासनातील अनेक अनुभव व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना भेडसावणाºया समस्या व त्याची सोडवणूक करण्यासाठी नियोजन करण्याचा सल्ला दिला. प्रास्ताविक प्राचार्य जयंत वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मोते यांनी उपस्थिताचे आभार पाठक यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हटवार, ढोक, चव्हान, जुलमे तसेच शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले.