‘कॉप’चा लॉलीपॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:39 PM2018-08-28T22:39:38+5:302018-08-28T22:39:56+5:30
भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. ७ आॅक्टोबरला उपाध्यक्षपदाची निवडणूक आणि सभापती व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे मागच्या दारातून नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देऊ, असा लॉलीपाप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता राजकीय पक्षांसह अपक्षही मनधरणी करण्याच्या कामाला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. ७ आॅक्टोबरला उपाध्यक्षपदाची निवडणूक आणि सभापती व स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे मागच्या दारातून नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी देऊ, असा लॉलीपाप देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याकरिता राजकीय पक्षांसह अपक्षही मनधरणी करण्याच्या कामाला लागले आहेत.
२७ सदस्य संख्या असलेल्या भद्रावती न.प. मध्ये सत्ताधारी शिवसेना १६, भाजपा ४, भारिप ४, कॉंग्रेस २, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. तीन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहेत.
संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत सदस्य आले आहेत. उरलेल्या एका सदस्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपा व भारिपकडेही चार सदस्य असल्याने चढाओढ लागली आहे. यातच काँग्रेसचे २ नगरसेवक व अपक्ष उमेदवाराचा पांठिबा कोणाला मिळतो याचीही चाचपणी केली जाते आहे. काँँग्रेस व अपक्ष स्वीकृत सदस्यांसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. स्वीकृत सदस्यत्वासाठी विविध राजकीय पक्षांकडून कोणाचे नाव समोर येते. त्याबाबतची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. ज्यांना सार्वत्रिक निवडणुकीत काही कारणास्तव सहभाग घेता आला नाही, अशांना तसेच पक्षातील जुन्या लोकांना या निमित्ताने संधी मिळावी, अशीही चर्चा आहे. या निवडणुकीत जे लढले पण हारले त्यांनाही स्वीकृत सदस्य व्हावे, अशी इच्छा आहे. त्यामुळे सदस्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अनेकांना कॉपचा ‘लॉलीपॉप’ दाखविण्यात आला आहे.