एक नजर लसीकरणावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:59+5:302021-06-02T04:21:59+5:30
चंद्रपूर : कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या निकषणानुसार जिल्ह्यात १६ लाख नागरिक ...
चंद्रपूर : कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या निकषणानुसार जिल्ह्यात १६ लाख नागरिक पात्र ठरतात. सोमवार (दि. १)पर्यंत ३ लाख ६७ हजार ३०२ नागरिकांनी लस घेतली. लसीकरण सुरू झाल्यापासूनच डोसचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या उद्दिष्टानुसार लसीकरणच होत नसल्याचे दिसून येत आहे. कोविडशिल्ड लस घेण्यासाठी ३४५ केंद्र तयार करण्यात आले. कोव्हॅक्सिन डोस कमी मिळत आहेत. त्यामुळे चंद्रपुरातील तीन ते चार केंद्रांवरच लसीकरण होत आहे. हीच गती कायम राहिल्यास २०२२ पर्यंत लसीकरण पूर्ण होणार की नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शून्य डोस वाया
मागणीच्या तुलनेत अल्प डोस मिळत आहेत. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी डोस संपतात. लस ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने विशेष कक्ष तयार केला. लस घेण्यासाठी कुपन सिस्टीम सुरू आहे. त्यामुळे डोस वाया जाण्याचे प्रमाण शून्य आहे. नागपुरातून कोव्हॅक्सिन व कोविडशिल्ड या दोन्ही लशी जि. प. आरोग्य विभागात आणल्यानंतर विशेष कक्षात ठेवले जाते. आरोग्य सेविकांना प्रशिक्षण दिल्याने जिल्ह्यात अद्याप एकही डोस वाया गेला नाही, असा दावा आरोग्य प्रशासनाने केला.