परसोडी धान्य दुकानदाराकडून नागरिकांची लूट

By admin | Published: January 15, 2015 10:49 PM2015-01-15T22:49:47+5:302015-01-15T22:49:47+5:30

येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

Looters of citizens from shopkeepers shop shop | परसोडी धान्य दुकानदाराकडून नागरिकांची लूट

परसोडी धान्य दुकानदाराकडून नागरिकांची लूट

Next

कोठारी: येथून आठ किलोमिटर अंतरावर असलेल्या परसोडी येथील धान्य दुकानदार गावकऱ्यांना जादा पैसे वसुल करून त्रास देत असल्याची तक्रार गोंडपिपरी तहसिलदारांकडे करण्यात आली आहे. सदर धान्य दुकानदाराचे दुकान रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी येथे २०-२५ वर्षापासून सरकारी स्वस्त धान्य दुकान चालविण्यात आहे. त्यांच्याकडे केरोसीन वाटपाचा परवाना आहे. सदर दुकानदार गावकऱ्यांना सरकारी दरापेक्षा जादा दराने धान्याचे वितरण करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
गावकऱ्यांच्या राशन कार्डावर नमुद दर्शविल्या युनिटप्रमाणे कधीही धान्य देत नाही. दुकानासमोर भावफलक लावण्यात आलेला नाही. त्याप्रमाणे धान्य साठ्याचा फलकही लावण्यात आला नाही. ग्राहकांना सदर दुकानदार धान्य खरेदीची पावती देत नाही. पावतीची मागणी केल्यास ग्राहकांसोबत असभ्य शब्दात बोलून त्याची मानहाणी करतो, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत गावकऱ्यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली असता केवळ चौकशीचा फार्स करीत धान्य दुकानदारांला वाचविण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जातो. योग्य, निष्पक्ष चौकशी करण्यास टाळाटाळ करतो. याबाबत तक्रारीची दखल घेत तहसिलदार यांनी नुकतीच दुकानदारांची नायब तहसिलदार शेख अब्दुला यांचेमार्फत चौकशी केली. मात्र त्यात त्यांनी दुकानदारांस झुकते माप दिल्याचा संशय सुरेंद्र चोथले यांनी वर्तविला आहे. चौकशी अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीमध्ये किंवा सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडे चौकशी करण्यापेक्षा दुकानदाराच्या घरी बसून गावकऱ्यांचे बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. धान्य दुकानदाराच्या जाचाला कंटाळलेले व दुकानदाराच्या भितीपोटी नागरिक मुक्तपणे दुकानदाराच्या घरी बयाण देण्यास कचरत होते.
सदर दुकानदाराकडे केरोसीन वाटप करण्याचा परवाना आहे. गरीबांचे केरोसीन धनदांडग्यांना जादा दरात विकताना गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वत: गोरखधंदा करीत गावकऱ्यांची पिळवणूक करण्याचा सपाटा या दुकानदाराने धरल्याच्या अनेक तक्रारी शासनदरबारी आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारीची गंभीर दखलच घेतली जात नाही. (वार्ताहर)

Web Title: Looters of citizens from shopkeepers shop shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.