एसटीचा मार्ग बदलल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 01:05 AM2019-08-28T01:05:18+5:302019-08-28T01:05:40+5:30
चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्यांना चंद्रपूरला शाळा, महाविद्यालयात येताना अडचण निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : नकोडा-मुंगोली-साखरा या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे कारण देवून मुकुटबन येथे जाणाऱ्या एसटीचा मार्ग बदलविण्यात आल्याने परिसरातील विद्यार्थ्यांने मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, मुकुटबन एसटीला जुन्याच रस्त्याने सुरु करावे, अशी मागणी आता नकोडा, शिंदोला, मुंगोली, कैलासनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूर आगाराची मुकुटबन बस मागील अनेक वर्षांपासून घुग्घूस, नकोडा, शिंदोला मार्गे जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही बस रस्ता खराब असल्याचे कारण देवून नायगाव, चारगाव चौकी मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शिंदोला, नकोडा, मुंगोली येथील विद्यार्थ्यांना चंद्रपूरला शाळा, महाविद्यालयात येताना अडचण निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून सुरु असलेल्या या बसमुळे अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथे प्रवेश घेतला आहे. मात्र आता या विद्यार्थ्यांची मोठी फजिती होत आहे. त्यामुळे बस जुन्याच रस्त्याने सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांचे निवेदन
चंद्रपूर-मुकूटबन ही दुपारची बस वेळेवर सुटत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस वेळेवर सोडण्याची मागणी केली होती. त्यातच आता बसचा रस्ताच बदलविण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल होत आहे.