समाज कल्याण शाळेतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:53 AM2019-09-05T00:53:37+5:302019-09-05T00:54:25+5:30
भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागामार्फ त प्राथमिक १९, माध्यमिक ९ व उच्च प्राथमिक तीन शाळा चालविल्या जातात. या सत्रात १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त इतर शाळांमध्ये १८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापनापर अनिष्ट परिणाम झाला. रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी यांच्याकडे केली आहे.
भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागामार्फ त प्राथमिक १९, माध्यमिक ९ व उच्च प्राथमिक तीन शाळा चालविल्या जातात. या सत्रात १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त इतर शाळांमध्ये १८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषदने प्राथमिक, माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळेतील पदे भरावी, रिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे केली.