प्रेमीयुगलाना जंगलात जाणे भोवले; वन विभागाकडून गुन्हा दाखल
By परिमल डोहणे | Published: January 14, 2024 06:48 PM2024-01-14T18:48:33+5:302024-01-14T18:48:51+5:30
वाघाची दहशत असतानाही जुनोना जंगलात जाणाऱ्या प्रेमीयुगलावर वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला.
चंद्रपूर: वाघाची दहशत असतानाही जुनोना जंगलात जाणाऱ्या प्रेमीयुगलावर वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा रविवारी दाखल करण्यात आला. हा पाहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहेत. जुनोना हे एक पर्यटन स्थळ आहे. या परिसरात सुट्टीच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगल जात असतात. मात्र या परिसरात नोव्हेंबर 2023 मध्ये बाबूपेठ येथील एका इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता.
तसेच कारवा बिटातसुद्धा अशीच घटना घडली होती. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवली होती. तसेच या परिसरात जाण्यास बंदी घातली होती. मात्र रविवारी एक प्रेमी युगल जंगलात गेले होते. वनरक्षकांनी त्यांना समजावून सांगितले असता त्यांनी अरेरावी केली. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुनोना जंगल परिसरात कुणीही जाऊ नये असे आवाहन मध्यचांदा वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक शेंडगे, चंद्रपूर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी आर नायगावकर यांनी केले आहे.