प्रेमीयुगुलांच्या रासलीलांनी नागरिकांत संताप

By admin | Published: October 21, 2014 10:48 PM2014-10-21T22:48:51+5:302014-10-21T22:48:51+5:30

काही प्रेमवीर प्रेमाच्या पवित्र नात्याला अपवित्र बनवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील निर्जन स्थळी हे प्रेमवीर पोहोचतात. मनात कुठलीही भीती न बाळगता सर्रास सार्वजनिक ठिकाणी

Lovers of romance celebrate citizens' anger | प्रेमीयुगुलांच्या रासलीलांनी नागरिकांत संताप

प्रेमीयुगुलांच्या रासलीलांनी नागरिकांत संताप

Next

चंद्रपूर : काही प्रेमवीर प्रेमाच्या पवित्र नात्याला अपवित्र बनवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील निर्जन स्थळी हे प्रेमवीर पोहोचतात. मनात कुठलीही भीती न बाळगता सर्रास सार्वजनिक ठिकाणी त्यांची रासलीला सुरू असते. प्रेम करणे गुन्हा नसला तरी सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे हा निश्चितच गुन्हा ठरतो. सध्या दिवाळीच्या सुट्या असल्याने काही परिसरात प्रेमीयुगलांची संख्या वाढली आहे.
शहरातील बसस्थानक, दाताळा मार्ग, पठाणपुरा गेट बाहेरील भाग, अंचलेश्वर मंदिर परिसर, जुनोना तलाव, रामाळा तलाव, चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा आदी परिसरात दुपार तसेच सायंकाळच्या सुमारास प्रेमी युगल आपल्या रासलिला करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दाताळा, तसेच पठाणपुरा गेट बाहेरील परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक सायंकाळी फेरफटका मारायला येतात. अनेक शाळकरी व महाविद्यालयीन मुले-मुली शाळेच्या बहान्याने घरून निघतात. परंतु ते शाळेत न जाता थेट निर्जनस्थळी पोहचतात. पठाणपुरा गेट बाहेर अनेक प्रेमीयुगल रस्त्याच्या कडेला वाहन लाहून तासन्तास गप्पा मारताना दिसते. मागील काही दिवसांमध्ये प्रेमीयुगलाच्या गंभीर घटना घडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. महिला दक्षता पथक शहरातील चौकाचौकात तसेच निर्जन कधीकाळी जातात. मात्र या पथकाची नजर चुकवून प्रेमीयुगलांची रासलिला सुरु असते.याकड लक्ष देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Lovers of romance celebrate citizens' anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.