जीवनाश्यक वस्तूंच्या किमती कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:20 AM2021-06-26T04:20:31+5:302021-06-26T04:20:31+5:30
वंचित बहुजन आघाडीची मागणी मूल : खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल व इतर जीवनाश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ...
वंचित बहुजन आघाडीची मागणी
मूल : खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल व इतर जीवनाश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. वाढलेले दर कमी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा मूलच्या वतीने करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविले आहे.
देशात कोरोनाचे संकट असून, गेल्या वर्षीपासून लाॅकडाऊनमुळे अनेक नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. लाॅकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडालेला असताना केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, खाद्यतेलाच्या दरात भरमसाट वाढ केलेली आहे. ही दरवाढ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना बी बियाणे, खते वाढीव दरात विक्री करणाऱ्या कृषी केंद्रधारकांवर कारवाई करा, ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कमी करण्यात आलेले आरक्षण पूर्ववत चालू करण्यात यावे, मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने पंतप्रधान यांच्याकडे पाठविण्यात आले. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते मधुकर उराडे, दिलीप वाळके, मुन्ना राव, मूलचे तालुकाध्यक्ष राजू गुरुनुले, विकास ठेकरे, यशवंत देवगडे, जी. एम. बांबोडे, संजय गेडाम, दुर्गे उपस्थित होते.