माना समाजाची तहसील कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:20 PM2018-10-15T23:20:25+5:302018-10-15T23:20:39+5:30
आदिवासी माना जमात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने रविवारी चेतावणी मोर्चाचे आयोजन करून तहसीलवर धडक देण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : आदिवासी माना जमात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने रविवारी चेतावणी मोर्चाचे आयोजन करून तहसीलवर धडक देण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नवखळा येथील माणिकादेवी मंदिराच्या प्रांगणातून या मोर्चाची सुरूवात झाली. अतिशय शिस्तबद्ध हा मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या विविध मागण्यांच्या घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शासन व प्रशासन माना जमातीला घटनादत्त अधिकारापासून वंचित ठेवत आहे.
माना जमातीला रितसर व सरसकट जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे व अन्याय करणाऱ्या तसेच खोटी माहिती देणाºया समिती अधिकाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या या चेतावणी मोर्चातून करण्यात आल्या. मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर माना आदिम जमातीचे जिल्हा अध्यक्ष देविदास जांभूळे, नारायण जांभूळे, अरविंद सांदेकर, निर्मला श्रीरामे, संदीप खळसंग, निरंजन गजभे, सुहानंद ढोक, मंगेश रंधये व विरुगजभे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन दिले.
मोर्चात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मनोहर धारणे, विलास गरमळे, नानाजी चौखे, श्रीकांत येकोडे, गौपाल दडमल,विनोद दडमल, नामदेव रंधये, संजय सारये,विलास गजभे व समाजबांधव उपस्थित होते.