मदनापूर ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:31 AM2021-03-01T04:31:50+5:302021-03-01T04:31:50+5:30

मासळ बु : चिमुर तालुक्यातील मदनापूर ग्रामपंचायतीला सन २०१९-२०२० वर्षीच्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा परिषद ...

Madanapur Gram Panchayat to Rs. R. Patil Sundar Gaon Award | मदनापूर ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

मदनापूर ग्रामपंचायतीला आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार

Next

मासळ बु : चिमुर तालुक्यातील मदनापूर ग्रामपंचायतीला सन २०१९-२०२० वर्षीच्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर येथे गौरविण्यात आले.

लोकसहभाग व श्रमदानातून गावकऱ्यांनी केलेली कामे, ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र्य योजना गावहितासाठी राबलेले कल्याणकारी उपक्रम व त्यातून घडलेल्या परिवर्तनामुळे मदनापूर गाव आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी पात्र ठरले. गावात स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण, पारदर्शकता या निकषानुसार विकास कामे झाली. गाव सर्वसोयी सुविधायुक्त आहे.

गावातील महिला, पुरुष बचत गट, शेतकरी बचत गट, वनहक्क समिती, युवक मंडळ हे ग्रामविकासासाठी एकवटले आहे. परिसरातील ग्रामपंचायतीचे मदनापूर ग्रामपंचायतीला भेटी देत असून, गावकऱ्यात उत्साह निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, पंचायत समिती सदस्य गीता अरुण कारमेंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास जांभुळे, गटविकास अधिकारी संजय पुरी यांच्या मार्गदर्शनातून सरपंच देवनाथ रंदये, उपसरपंच वसंता श्रीरामे ग्रामसेवक केशव गजभे ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर डुमरे, सुरेखा दोडके, धनराज मगरे, शीला ठवरे, शारदा कामडी, वर्षा ढोक, विशेष योगदान देणारे ग्रामसंघाच्या अध्यक्ष रेखा डुमरे, पशुसखी प्रतिभा केळझरकर, ग्रामसंघाचा कोषाध्यक्ष चंद्रकला खाटे, अंगणवाडी सेविका मगरेताई, मदतनीस, शिक्षक, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

उपक्रमशील ग्रामपंचायत अशी ओळख

मदनापूर गावाची ओळख सातासमुद्रापार आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी मदनापूर ला बफर झोनचे गेट आहे. या गेटवरून आतापर्यंत अनेक दिग्गज नेते, अभिनेते, क्रिकेटपटू जंगल भ्रमण करण्यासाठी गेले. मदनापूर ग्रामपंचायतीने आतापर्यंत एक गाव एक गणपती, सार्वजनिक सन, उत्सव, पेपर लेस ग्रामपंचायत म्हणून तालुक्यातुन मान मिळाला होता. संवर्ग विकास आधिकारी जाधव व विस्तार अधिकारी गुंतीवार यांच्या हस्ते ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले होते हे विशेष.

Web Title: Madanapur Gram Panchayat to Rs. R. Patil Sundar Gaon Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.