महाज्योती देणार १० हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:16+5:302021-09-27T04:30:16+5:30
ओबीसी व भटके जाती, जमातीचे विद्यार्थी दहावी पास होऊन विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. इंजिनिअर, ...
ओबीसी व भटके जाती, जमातीचे विद्यार्थी दहावी पास होऊन विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात. इंजिनिअर, डॉक्टर होण्याची इच्छा व पात्रताही असते. मात्र, जेईई, नीट व एमएचसीईटीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शिकवणी वर्ग लावण्याची ऐपत नसते.
गुणवंत अजूनही हे विद्यार्थी या महागड्या स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहतात. त्यामुळे ‘महाज्योती’ने मागील वर्षीपासून अशा विद्यार्थ्यांसाठी जेईई, नीट व एमएचसीईटी स्पर्धा परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे. यावर्षीदेखील ही योजना नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केलेली आहे. जे विद्यार्थी यावर्षी दहावीची परीक्षा पास झालेले आहेत, ज्यांनी ११वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला आहे. तसेच बारावी पास होऊ न २०२३ मध्ये नीट जेईई एमएचसीईटी स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. त्यांनी महाज्योतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट ओआरजी डॉट इन या वेबसाइटवर जाऊन ३१ ॲाक्टोबर २०२१ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
बॉक्स
मोफत टॅबसह इंटरनेट डेटा
शहरी विद्यार्थ्यांना ७० टक्के, तर ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दहावीत ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. त्यांनी अकरावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्यक आहे. ओबीसी, भटके जाती व विशेष मागास प्रवर्ग यांचे जात व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र अर्जासोबत ऑनलाइन मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, शासन निधीच्या उपलब्धतेनुसार मोफत टॅब व प्रतिदिन सहा जीबी मोफत इंटरनेट डेटा दिला जाईल. याशिवाय स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके मोफत घरपोच पाठविली जाणार आहे.