महाआॅनलाईन सेवांची होणार चौकशी

By admin | Published: January 6, 2015 10:58 PM2015-01-06T22:58:02+5:302015-01-06T22:58:02+5:30

जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महाआॅनलाईनची सेवा सुरु करण्यात आली. मात्र अतिरिक्त पैसा वसुल करीत असून यामुळे शासनाला मोठा फटका बसला आहे. आता या कंपनीच्या कामाची चौकशी होणार आहे.

Mahanline services inquiry inquiry | महाआॅनलाईन सेवांची होणार चौकशी

महाआॅनलाईन सेवांची होणार चौकशी

Next

चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या महाआॅनलाईनची सेवा सुरु करण्यात आली. मात्र अतिरिक्त पैसा वसुल करीत असून यामुळे शासनाला मोठा फटका बसला आहे. आता या कंपनीच्या कामाची चौकशी होणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी वित्त समितीमध्ये चौकशी करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून वित्त समितीच्या सभापतीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.
पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण, कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी ई-पंचायत मिशन माडेल प्र्रोजेक्ट म्हणून राज्यमध्ये राबविण्यात आला. त्याकरिता १३ व्या वित्त आयोगांतर्गत ई-पंचायत, संग्राम प्रकल्पांतर्गत पंचायतची राज संस्थांना देण्यात येणाऱ्या सेवात ग्राम पंचायत स्तरावरील माहिती आॅनलाईन करण्याकरिता डाटा एन्टी करणे व ती प्र्रकाशित करण्यासाठी शासनाने महाआॅनलाईन या खासगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला.
याबाबत जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची विशेष सभा बोलावून जिल्हातील सर्व पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी व सहाय्यक लेखा अधिकारी यांनी पाचारण करून त्याचा आढावा घेण्यात आला. मात्र पंचायत समिती मार्फत कोणत्याही स्वरुपाची माहिती समितीला देण्यात आली नाही. याबाबत अहिरकर यांनी वित्त समितीच्या सभेमध्ये विषय ठेवला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Mahanline services inquiry inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.