महारक्तदानाने बाबूजींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:12 PM2019-07-02T22:12:21+5:302019-07-02T22:12:40+5:30
ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी लोकमत जिल्हा कार्यालय व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाबूजींच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृहात सकाळी ११ वाजता श्रद्धेय बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पांजली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा तर उद्घाटक म्हणून यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार तसेच मंचावर माजी नगरसेवक तथा जल बिरादरी संस्थेचे अध्यक्ष संजय वैद्य, रमण बोथरा, पतंजली योग समिती प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विमल कांस्टिया, युवा मित्र फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश काहिलकर, सामाजिक कार्यकर्ता अश्विन मुसळे, लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ. अश्विन बाभरे, वन विभागाचे अॅड. सुरेंद्र बन्सोड, लोकमतचे शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमत जिल्हा प्रतिनिधी राजेश भोजेकर, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी अरूण सहाय उपस्थित होते.
किशोर जोरगेवार आणि कांस्टिया यांनी लोकमतच्या उपक्रमांची प्रशंसा केली. यावेळी अनेक नागरिकांनी रक्तदान केले. संचालन सोनम मडावी यांनी केले.
शतक ओलांडणारे रक्तदाते संजय वैद्य
राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून विधायक कार्याचा ठसा उमटविणारे सजग नेतृत्व म्हणून माजी नगरसेवक संजय वैद्य यांची ओळख आहे. मात्र, रक्तदान चळवळीत अत्यंत निष्ठेने योगदान देऊन त्यांनी आरोग्य क्षेत्रातही बांधिलकी जोपासली. गरजु रूग्णांना रक्त मिळावे, यासाठी त्यांनी रक्तदानाची शंभर गाठली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान करून १०१ हा आकडा पूर्ण केला आहे.