बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:37+5:30
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकमत जिल्हा कार्यालय येथील हॉल, धनराज प्लाझा, दुसरा माळा, आझाद बगिचाजवळ, चंद्रपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकमत जिल्हा कार्यालय येथील हॉल, धनराज प्लाझा, दुसरा माळा, आझाद बगिचाजवळ, चंद्रपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी व खासगी नोकरीतील कर्मचारी, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी आदींनी सहभागी होऊन रक्तदान करावे. अधिक माहितीकरिता सोनम मडावी (९९७५६६६३५५), ९८५०३०४१४७ यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमात सखी मंच सदस्यांनी सहभागी व्हावे. कोरोनाचा संसर्ग होवू नये, याकरिता शिबिरात सहभागी होणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. रक्तदात्याला ब्लड डोनर कार्ड, प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देण्यात येणार आहे.
सहभागी संघटना
कमल बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, (अध्यक्ष : नेत्रा इंगुलवार)
विठाई बहुउद्देशीय संस्था, चंद्रपूर, (अध्यक्ष: महेश काहीलकर )
जलबिरादरी चंद्रपूर (संयोजक: संजय वैद्य )
सह्याद्री प्रतिष्ठान, चंद्रपूर (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष : दिलीप रिंगणे
ईको-प्रो (अध्यक्ष : बंडू धोतरे )
भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी, चंद्रपूर (विदर्भ संपर्क प्रमुख शेखर तावाडे )
गणपती प्रतिष्ठान, चंद्रपूर (अध्यक्ष: सौरभ ठोंबरे)
चंद्रपूर बचाव संघर्ष समिती चंद्रपूर (अध्यक्ष : डॉ. गोपाल मुंधडा )
विशेष सहकार्य : श्री आनंद नागरी बँक, चंद्रपूर (अध्यक्ष : दीपक पारख)
सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात येणार आहे. सॅनिटायझरची व्यवस्था आहे, यासोबतच फिजिकल डिस्टन्सिंगचा नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे.
एका रक्तदानामुळे तीन रुग्णांचा जीव वाचतो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाची संख्या कमी झाली आहे. रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून प्रत्येकाने जबाबदारी म्हणून रक्तदान करायला हवे. आपल्या एका रक्तदानामुळे तीन रुग्णांचा जीव वाचतो. रक्तदात्यांनी मास्क घालून, सॅनिटायझरचा वापर करून व फिजिकल डिस्टन्सिंंग पाळून रक्तदान करावे.
- डॉ. हरीश वरभे, संचालक, लाईफलाईन रक्तपेढी