वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
By राजेश भोजेकर | Published: October 30, 2024 09:32 AM2024-10-30T09:32:54+5:302024-10-30T09:49:09+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : चिमूरमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तर राजुरात काँग्रेस, स्वभाप व भाजप अशी तिरंगी लढत आहे. लोकसभेत प्रभावहीन ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभावही या निमित्ताने अधाेरेखित हाेईल.
Maharashtra Assembly Election 2024 : चंद्रपूर : सहाही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीतच चुरशीची लढत आहे. विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे हेवीवेट सुधीर मुनगंटीवार आणि काॅंग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर या तिन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वराेऱ्यात धानाेरकरांच्या बंधूना उमेदवारी दिल्याने दिवंगत बाळू धानोरकर यांचे दुखावलेले बंधू अनिल हे वंचितकडून रिंगणात आहेत तर किशाेर जाेरगेवार भाजपचे उमेदवार झाल्याने हे मतदारसंघ लक्षवेधी ठरत आहेत. चिमूरमध्ये भाजप व काँग्रेसमध्ये तर राजुरात काँग्रेस, स्वभाप व भाजप अशी तिरंगी लढत आहे. लोकसभेत प्रभावहीन ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभावही या निमित्ताने अधाेरेखित हाेईल.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
राजुरा क्षेत्रात विमानतळ, सिंचन, स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न गंभीर.
बल्लारपुरात मुनगंटीवारांनी केलेल्या विकासाचे विरोधकांपुढे आव्हान आहे.
चंद्रपूर क्षेत्रात स्थानिकांना रोजगार, २०० युनीट वीज मोफत, प्रदूषण.
वरोरा क्षेत्रात सिंचन, रस्ते, कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांचे शोषण
हे मुद्दे गाजणार.
चिमूर क्षेत्रात चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीचा मुद्दा रेंगाळतच. वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गाचे संथ गती.
ब्रह्मपुरी क्षेत्रात वडेट्टीवारांसारख्या बलाढ्य नेत्यापुढे अन्य उमेदवार
थिटे वाटत आहे.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असे
विधानसभा मतदारसंघ मतदान विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मते
७० - राजुरा ७१% सुभाष धोटे काँग्रेस ६०,२२८
७१ - चंद्रपूर ५१% विद्यमान आमदार अपक्ष १,१७,५७०
७२ - बल्लारपूर ६२% सुधीर मुनगंटीवार भाजप ८६,००२
७३ - ब्रह्मपुरी ७१% विजय वडेट्टीवार काँग्रेस ९६,७२६
७४ - चिमूर ७४% कीर्तीकुमार भांगडिया भाजप ८७,१४६
७५ - वरोरा ६२% प्रतिभा सुरेश धानोरकर काँग्रेस ६३,८६२