Maharashtra Election 2019 : बल्लारपूर विधानसभा क्षेत्र शंभर टक्के आरोयुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:01:01+5:30
मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बल्लारपूरात डायमंड कटींग व प्रशिक्षण केंद्र, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी असे विविध उपक्रम आपण कार्यान्वीत केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येत्या काळात बल्लारपूर विधानसभा क्षेत्र शंभर टक्के आरोयुक्त करण्याचा आपला संकल्प असून नागरिकांच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या बळावर हा संकल्प आपण निश्चितपणे पूर्ण करू, असा विश्वास बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय आपण नागरिकांच्या सेवेत रूजु केले. टाटा ट्रस्टच्या मदतीने लवकरच कॅन्सर हॉस्पीटल चंद्रपुरात उभारयात येणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील हे पहिले कॅन्सर हॉस्पीटल ठरणार आहे. रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र, बल्लारपूरात डायमंड कटींग व प्रशिक्षण केंद्र, मधुमक्षिका पालनाचा कृषी उद्योग, अगरबत्ती उत्पादन प्रकल्प, पोंभुर्णा येथे आदिवासी महिलांची पहिली कुक्कुटपालन कंपनी असे विविध उपक्रम आपण कार्यान्वीत केले आहे.
चंद्रपूर तालुक्यातील भटाळी येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम, सुभाष गौरकार आदींची उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्थेला आपण नेहमीच अग्रक्रम दिला असून आसोलामेंढा सिंचन प्रकल्पाला गोसेखुर्दचे पाणी यामुळे जिल्ह्याला मिळाले आहे. जिल्ह्यात एक लाख ४५ हेक्टर सिंचन होत आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून मिळणाऱ्या उजव्या कालव्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, सावली, चिमूर, मूल, पोंभुर्णा या तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे, जिल्ह्यातील मामा तलावांना पुनरूज्जीवीत करण्यासाठी आपण पुढाकार घेतला. चिचडोह बॅरेज अंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील २८ व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ अशा एकूण ७१ गावांना पिण्याचे पाणी व ११ हजार ५१० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ मिळणार आहे. पळसगाव-आमडी उपसा जलसिंचन योजनेतंर्गत पळसगाव, आमडी, आष्टी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, लावारी, दुधोली, बामणी, केम या दहा गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या दहा गावातील एकूण दोन हजार ४६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
बल्लारपूर तालुक्यातील शिवणी चोर सिंचन प्रकल्पाचे पुनरूज्जीवन, बल्लारपूर तालुक्यातील भिवकुंड नाल्याच्या पुनरूज्जीवनाचे काम प्रगतीपथावर, मूल तालुक्यातील चिचाळा व नजिकच्या सहा गावांना सिंचन सुविधा पुरविण्यासाठी २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधी मंजूर केला. येत्या काळात हा जिल्हा पाणीदार करण्याचा आपला संकल्प असून तो नागरिकांच्या आशिर्वादाच्या बळावर निश्चितपण पूर्ण होईल, असेही सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी भटाळी येथील पहिल्या दहा मतदारांचा सत्कार करण्यात आला. जाहीर सभेला भटाळी येथील व परिसरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.