Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात वडेट्टीवारांसह काँग्रेसही जिंकली; तर दुसरीकडे भाजप हरली, मुनगंटीवार व भांगडिया मात्र जिंकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:41+5:30

चंद्रपूरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ७२,१०७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-३, भाजप-२ व अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल झाले आहेत. एकूणच निकालावरून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे जिंकले, भाजप मात्र हरली, दुसरीकडे वडेट्टीवारांसह काँग्रेस जिंकल्याचा सूर होता.

Maharashtra Election 2019 ; Congress also won in the district along with the Vadettiwar; On the other hand, BJP lost, Mungantiwar and Bhangadia won | Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात वडेट्टीवारांसह काँग्रेसही जिंकली; तर दुसरीकडे भाजप हरली, मुनगंटीवार व भांगडिया मात्र जिंकले

Maharashtra Election 2019 ; जिल्ह्यात वडेट्टीवारांसह काँग्रेसही जिंकली; तर दुसरीकडे भाजप हरली, मुनगंटीवार व भांगडिया मात्र जिंकले

Next
ठळक मुद्देचंद्रपूरात जोरगेवारांची लक्षवेधक विजयी मिरवणूकसुधीर मुनगंटीवार सहाव्यांदा विजयी तर वडेट्टीवारांचा पाचव्यांदा विजयराजुरा व वरोऱ्यात काट्याची टक्कर, काँग्रेस विजयीचिमूरात युवा व मातृशक्तीचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही मतदार संघात चुरशीच्या लढती झाल्या. भाजपने बल्लारपूर व चिमूर या दोन विधानसभा मतदार संघात विजय संपादन केला तर काँग्रेसने ब्रह्मपुरी, राजुरा आणि वरोरा विधानसभा मतदार संघात विजय मिळविण्यात यश मिळविले. चंद्रपूरात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी तब्बल ७२,१०७ इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस-३, भाजप-२ व अपक्ष -१ असे पक्षीय बलाबल झाले आहेत. एकूणच निकालावरून भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे जिंकले, भाजप मात्र हरली, दुसरीकडे वडेट्टीवारांसह काँग्रेस जिंकल्याचा सूर होता.
चंद्रपूर मतदार संघात अपक्ष किशोर जोरगेवार व भाजपचे नाना श्यामकुळेंमध्ये झालेल्या एकतर्फी लढतीत जोरगेवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाले. काँग्रेसचे महेश मेंढे हे चवथ्या क्रमांकावर फेकल्या गेले. वंचितचे अनिरुद्ध वनकर यांनी १५,११७ मते घेत तिसºया स्थानावर झेप घेतली.
बल्लारपूरात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे यांच्यात झालेल्या लढतीत मुनगंटीवार यांनी ३२,८५८ मताधिक्याने विजय संपादन केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजू झोडे यांना ३९,३८२ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. राजुरा विधानसभा मतदार संघात अतिशय अटीतटीत झालेल्या चौरंगी लढतीत कॉग्रेसचे सुभाष धोटे अवघ्या २,५०९ मतांनी विजयी झाले. सुरुवातीला स्वभापचे अ‍ॅड. वामनराव चटप हे आघाडीवर होते. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये धोटेंनी चुरशीच्या लढतीत विजयावर शिक्कामोर्तब केले. भाजपचे विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांना ५०,९०० मते घेत तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे गोदरू जुमनाके यांनी तब्बल ४३,१४५ मतांपर्यंत अनपेक्षित मजल मारली. ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार व शिवसेनेचे संदीप गड्डमवार यांच्यात थेट लढत झाली. सुरुवातीपासूनच वडेट्टीवार हे आघाडीवर होते. अखेरच्या टप्प्यात १८,५३८ इतक्या मताधिक्याने वडेट्टीवारांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. चिमूर विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार किर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया व काँग्रेसचे डॉ. सतीश वारजुकर यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत भांगडिया दुसºयांदा विजयी झाले. भाजप बंडखोर धनराज मुंगले हे ११,१६२ मते घेत चवथ्या क्रमांकावर स्थिरावले. वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सांदेकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. वरोरा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व माजी मंत्री शिवसेनेचे संजय देवतळे यांच्यात झालेल्या काट्याच्या लढतीत धानोरकर या १० हजार ३६१ मतांनी विजयी नोंदवत जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार ठरल्या.

सहाही मतदार संघात ताणली होती उत्सुकता
मतमोजणी सुरूवात झाल्यापासूनच सहाही मतदार संघाच्या लढतीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून होते. चंद्रपूर विधानसभा मतदार संघाच्या लढतीकडे चंद्रपूरसह जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भातील जिल्ह्यांचेही लक्ष लागले होते.
चिमूर विधानसभा मतदार संघात सुरुवातीला काँग्रेसचे डॉ. सतीश वारजुकर आणि भाजपचे कीर्तीकुमार भांगडिया यांच्यात चुरशीची आणि काट्याची लढत बघायला मिळाली. काही फेऱ्यांमध्ये सतीश वारजुकर आघाडीवर होते. नंतर भांगडिया यांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत वाढवित नेली.

राजुऱ्याने वेधले अचानक लक्ष
राजुरा विधानसभा मतदार संघात सुरुवातीपासून स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप आघाडीवर होते. त्यांनी पाच हजारांपर्यंत आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय पक्का मानला जात होता. मात्र अखेरच्या फेऱ्यांमध्ये अ‍ॅड. चटप माघारत गेले आणि काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी बरोबरी करीत आघाडी घेतली. अखेरच्या फेरीपर्यंत उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सुभाष धोटे यांनीच विजयावर शिक्कामोर्तब केल्याने अ‍ॅड. वामनराव चटप यांना अखेरच्या टप्प्यात विजयापासून दूर जावे लागले.

वरोऱ्यात देवतळेंचा धक्कादायक पराभव
वरोरा विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व शिवसेनेचे संजय देवतळे यांच्यात चुरशीचा सामना रंगला. सुरुवातीपासूनच संजय देवतळे तर कधी प्रतिभा धानोरकर एकमेकांची आघाडी कमी करीत होते. यामध्ये संजय देवतळे विजयावर शिक्कामोर्तब करतील, असे चित्र वर्तविले जात असताना अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली. ही आघाडी वाढतच जावून त्यांनी विजय संपादन केला. तर संजय देवतळे यांना पराभवाचा सामना करावा लागला. देवतळे सहज विजयाची अपेक्षा बाळगून होते.

या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
जनतेनी पक्षापेक्षा उमेदवाराकडे पाहुन मतदार केल्याचे एकूणच निकालावरून लक्षात येणारे आहेत.
मतदानातून जनतेला विकासकामे अपेक्षित आहे हे पुन्हा एकवार जनतेनी दाखवून दिलेले आहेत. निष्क्रिय चेहरे जनतेला रुचले नाही.
सुधीर मुनगंटीवार व कीर्तीकुमार भांगडिया यांनी केलेल्या विकासकामांमुळेच जनतेनी त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला.

पराभवाची हॅट्ट्रिक
अ‍ॅड. वामनराव चटप हे २००९ व २०१४ तसेच आता ही अशा तीन निवडणूका हरलेत. संजय देवतळे हे २०१४ लोकसभा, विधानसभा व आता विधानसभा अशा तीन निवडणूका हरले. तसेच संदीप गड्डमवार हेसुद्धा पहिल्यांदा अपक्ष नंतर राकाँच्या तिकीटावर आता शिवसेनेच्या तिकिटावर हरले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Congress also won in the district along with the Vadettiwar; On the other hand, BJP lost, Mungantiwar and Bhangadia won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.