Maharashtra Election 2019 : मी कोणत्या पक्षाचा नाही, तर जनतेचा उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:09 AM2019-10-08T00:09:14+5:302019-10-08T00:09:57+5:30

२४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी जनतेपुढे काढले.

Maharashtra Election 2019 : I am not a party candidate, but a candidate for the people | Maharashtra Election 2019 : मी कोणत्या पक्षाचा नाही, तर जनतेचा उमेदवार

Maharashtra Election 2019 : मी कोणत्या पक्षाचा नाही, तर जनतेचा उमेदवार

Next
ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : लोकभावना लक्षात घेऊन रिंगणात कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मी निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी चंद्रपूरकरांना २४ तासांचा अवधी मागितला होता. मात्र या २४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी जनतेपुढे काढले.
सोमवारी चंद्रपूरमधील तुकूम येथील मातोश्री सभागृहात किशोर जोरगेवार यांचा जनतेशी जनसंवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जनतेला निवडणूक लढवणार की नाही, याविषयीचे त्यांचे मत सांगताना ते बोलत होते. जनतेच्या भावना लक्षात घेऊन किशोर जोरगेवार यांनी मी निवडणूक लढवणार, अशी घोषणा याप्रसंगी केली. या कार्यक्रमाला सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, बबनराव लंड, ख्रिश्चन समाज जिल्हा अध्यक्ष सुधाकर रामटेके, गंगाधर वैद्य, बबलू मेश्राम, जावेद खान, चंद्रमा यादव, वंदना हातगावकर, चंदाताई इटनकर, शाईन शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
किशोर जोरगेवार यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने रद्द केल्याने किशोर जोरगेवार यांनी आपण निवडणूक लढावी की नाही याबद्दलची माहिती स्पष्ट केलेली नव्हती. यामुळे किशोर जोरगेवार हे निवडणूक लढवणार की नाही यावर चंद्रपूरकरांमध्ये संभ्रम होता.
याचे पडसाद रविवारी दिवसभरच चंद्रपूर शहरात उमटताना पाहायला मिळाले. हजारो नागरिकांनी रविवारी जोरगेवार यांनी लढावे, या मागणीसाठी जोरगेवार यांच्या घरी व कार्यालयात ठाण मांडले होते. या पार्श्वभूमीवर आज मातोश्री सभागृह येथे जनसंवाद कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात नागरिकांची मत जाणून घेऊन किशोर जोरगेवार यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Maharashtra Election 2019 : I am not a party candidate, but a candidate for the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.