Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:36+5:30

चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम आदींची उपस्थिती होती.

Maharashtra Election 2019 ; Our goal is the overall development of Chandrapur district | Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय

Maharashtra Election 2019 ; चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दुर्गापूर येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी माझ्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. या विधानसभा क्षेत्राचाच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचा विकास करण्याचा गेल्या पाच वर्षात मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. मिशन शौर्यच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टसारखे उंच शिखर सर केले. एमपीएससी, युपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय असावे, यासाठी मिशन सेवाच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिकांची निर्मिती केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपली पुन्हा एकदा साथ हवी आहे, असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर तालुक्यातील दुगार्पूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप नेते रामपाल सिंह, जिल्हा परिषद सदस्य रोशनी खान, वनिता आसुटकर, माजी जि.प. सदस्य विलास टेंभुर्णे, नामदेव आसुटकर, पंचायत समिती सदस्य संजय यादव, भाजप तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, श्रीनिवास जनगम आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, दुर्गापूर परिसरात सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या माध्यमातृन उत्तम सोय उपलब्ध झाली आहे. ऊर्जानगर येथे आठ कोटी ७८ लक्ष रू. किमतीची पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाली आहे. चंद्रपूर तालुक्यातील ५० गावांमध्ये आरो मशीनद्वारे शुध्द पेयजल पुरवठा आपण करीत आहोत. दुगार्पूर येथे स्मार्ट पोलीस स्टेशनची निर्मिती आपण केली आहे.
हा मतदार संघ शंभर टक्के आरोयुक्त, एलपीजी गॅसयुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. मतदार संघातील अंगणवाडया पूर्णपणे आयएसओ मानांकित करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विकासाचे हे पर्व नागरिकांच्या मदतीने आपण पुढे नेऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या सभेला परिसरातील प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभेपूर्वी दुगार्पूर परिसरात रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. तत्पूर्वी समतानगर, नेरी, कोंडी या परिसरात बैठकींना सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. सिनाळा, वरवट, चोरगांव या गावांमध्ये भेटी देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
यावेळी कॉंग्रेसचे रमेश पुलिपाका, सतिश मासीरकर, समीर शेख यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचा दुप्पटा घालून त्यांचे स्वागत केले व पक्षप्रवेशाबाबत शुभेच्छा दिल्या.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Our goal is the overall development of Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.