Maharashtra Election 2019 ; विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:01:01+5:30

कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केले.

Maharashtra Election 2019 ; Support the chariot of development to move faster | Maharashtra Election 2019 ; विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी साथ द्या

Maharashtra Election 2019 ; विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी साथ द्या

googlenewsNext
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार । विसापूर, कोठारी, बामणी, मानोरा येथे जाहीर सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : १९९५ मध्ये बल्लारपूर तालुका निर्मितीचे आश्वासन मी दिले होते. बल्लारपूर तालुक्याची निर्मिती झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत कोठारी तालुका निर्मितीबाबत मी नागरिकांना शब्द दिला होता. नवीन जिल्हे व तालुका निर्मितीबाबत शासनाचे धोरण नसल्यामुळे आम्ही कोठारी येथे अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाला मंजुरी मिळवून दिली. ही तालुका निर्मितीच्या दृष्टीने खरी सुरूवात आहे. कोठारीला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्याचा शब्द मी नागरिकांना दिला तो पूर्ण करेनच, अशी ग्वाही बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
लोकशाहीत मतदान हा पवित्र हक्क समजला जातो. आपले मत हे केवळ विकासासाठी द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथे आयोजित जाहीर सभेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, पंचायत समितीचे सभापती गोविंद पोडे, माजी सभापती राजू बुध्दलवार, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुध्दलवार, भाजपचे तालुका सरचिटणीस रमेश पिपरे, पंचायत समितीच्या उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, सुनील फरकडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोठारी येथे खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन कोटी ९८ लाख रू. किंमतीची पाणी पुरवठा योजना आपण पूर्ण केली. बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांसाठी ३५ कोटी ७८ लाख रू. किंमतीची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. कळमना येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण केले.
मानोरा येथे विशेष बाब या सदराखाली प्राथमिक आरोग्य केंद्र आपण मंजूर करविले. विकासकामांना सामाजिक उपक्रमांची जोड देत जनकल्याणाचा वसा आम्ही सातत्याने जोपासला आहे.
आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर व त्या माध्यमातून मोफत चष्मे वितरण, अटल दिव्यांग स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून अपंगांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकलींचे वितरण, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिकांचे निर्माण, मिशन शक्तीच्या माध्यमातून येत्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यासाठी क्रीडा संकुलांची निर्मिती असा विविधांगी विकास आपण करीत आहोत, असेही ते म्हणाले. कोठारी येथील सभेनंतर मानोरा, बामणी, विसापूर या ठिकाणीसुध्दा जाहीर सभांना त्यांना संबोधित केले. तत्पूर्वी गिलबिली, आसेगांव, मोहाडी तुकूम, इटोली, दहेली, कोर्टीमक्ता, कळमना, लावारी, पळसगाव, आमडी, काटवली, कवडजई, नांदगाव (पोडे), हडस्ती आदी गावांना त्यांनी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.

सिंचनासाठी भरीव काम
परिसरातील १० गावांसाठी सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारी पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजना आपण पूर्ण करविली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिंचनाच्या दूष्टीने अतिशय महत्त्वाचा चिचडोह सिंचन प्रकल्प आपण पूर्ण केला आहे. माजी मालगुजारी तलावांच्या नुतनीकरणाचा व दुरूस्तीचा कार्यक्रम आपण हाती घेतला आहे. विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Support the chariot of development to move faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.