वासेरा येथे महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:52 AM2021-02-28T04:52:56+5:302021-02-28T04:52:56+5:30

सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी मंदिरासमोर घटस्थापना करण्यात आली. किन्ही येथील गुरुदेव सेवक मुखरू मारबते यांच्या हस्ते होमहवन पूजा करण्यात ...

Maharshi Valmiki Rishi Jayanti Festival at Wasera | वासेरा येथे महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती महोत्सव

वासेरा येथे महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती महोत्सव

Next

सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी मंदिरासमोर घटस्थापना करण्यात आली. किन्ही येथील गुरुदेव सेवक मुखरू मारबते यांच्या हस्ते होमहवन पूजा करण्यात आली. महोत्सवात महिलांचा हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम व रांगोळी स्पर्धा पार पडली. रात्रीला जागृतीपर भजनाचा कार्यक्रम झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी महर्षी वाल्मीकी ऋषी पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

श्री महर्षी वाल्मीकी ऋषी जयंती महोत्सवाचे उद्घाटक वासेरा येथील सरपंच महेश बोरकर होते, तर प्रमुख पाहुणे उपसरपंच मंदाताई मुनघाटे होत्या. कार्यक्रमाला उपसभापती शीला कन्नाके, राजू नंदनवार, माया सलामे, महेंद्र सूर्यवंशी, संगीता चिमालवार, हेमंत सूर्यवंशी, खुशाब लांजेवार, रवींद्र बोर्डेवार देवेंद्र तलांडे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झालीत. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य दिलीप मेश्राम यांनी तर सूत्रसंचालन राजू मेश्राम यांनी केले. आभार मंदा अनिल मेश्राम यांनी मानले.

Web Title: Maharshi Valmiki Rishi Jayanti Festival at Wasera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.