महात्मा गांधी जयंती साजरी

By Admin | Published: October 3, 2015 12:58 AM2015-10-03T00:58:37+5:302015-10-03T00:58:37+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, राजकीय पक्षातर्फे साजरी करण्यात आली...

Mahatma Gandhi Jayanti Celebration | महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

googlenewsNext

चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती शुक्रवारी जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, राजकीय पक्षातर्फे साजरी करण्यात आली.
चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी
चंद्रपूर येथे काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची अध्यक्ष नंदू नागरकर, प्रदेश सचिव सुनिता लोढीया, सरचिटणीस नंदा अल्लुरवार, सेवादल अध्यक्ष प्रमोद राखुंडे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, महेश मेंढे, अ‍ॅड. भास्कर दिवसे, केशव रामटेके, सुलेमान अली, विनोद संकत, नगरसेवक प्रदीप डे, वंदना भागवत, दीप्ती रामटेके, सुरेश दुर्सेलवार, दीपक कटकोजवार, श्याम राजुरकर, अनिल सुरपाम, निखिल धनवलकर, गिरीश पात्रीकर, वैभव बानकर, श्रीकांत बोकडे, अतुल वानखेडे, प्रवीण लांजेवार, अजय दास आदी उपस्थित होते.
प्रियदर्शिनी कन्या विद्यालय चंद्रपूर
येथील आयोजित कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका आशा दाते, वैशाली भलमे, कर्मवती बांबोळे, उमाकांत पिसे आदी उपस्थित होते. संचालन सबा पठाण तर आभार रिता बांगडे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
गांधी चौक भद्रावती
राष्ट्रपिता नगरविकास मंचतथा प्रियदर्शिनी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था गांधी चौक येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वच्छता अभियानांतर्गत कचरापेट्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार साळुंखे होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार बोत्रे, सहा.पोलीस निरीक्षक हेमणे, पोलीस उपनिरीक्षक मेघालीे गावंडे, दिलीप ठेंगे, जितेंद्र कुमार, न.प. उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, घोडमारे, धनंजय गुंडावार उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन रवींद्र ढेगळे यांनी केले.
सरस्वती विद्यालय, चंद्रपूर
येथे आयोजित कार्यक्रमाला सुनील घटे, प्रा. यशवंत मुलेमवार उपस्थित होते. संचालन व आभार कविता नागपूरकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Mahatma Gandhi Jayanti Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.