महात्मा गांधीजींचे विचार संतश्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:18 PM2019-01-29T23:18:23+5:302019-01-29T23:18:44+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या निधीतून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात ग्रंथोत्सव घेण्यात आला होता. मुरलीमनोहर व्यास यांनी विचारपुष्प गुंफले. ते म्हणाले, गांधीजींच्या जीवनात शिस्तीचे अनन्यसाधरण महत्व होते. गांधीजी व्यक्ती नसून शाश्वत विचारधारा आहे. त्यांचा प्रत्येक विचार मननीय व चिंतनीय आहे. त्यांचे विचार राज्यकर्ते व समाजाने आत्मसात केले असते तर आज अनेक निर्माण झाल्या नसत्या. ग्रंथजत्रा कार्यक्रमात म. गांधी यांचे साहित्य व त्यांचे विचार या विषयावर व्यास बोलत होते. २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्रंथजत्रा कार्यक्रमाला जिल्ह्यातील वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे वाचन चळवळीला गती मिळाली. विद्यार्थी व विविध क्षेत्रातील ्रमान्यवरांनी ग्रंथजत्रेत सहभागी होऊन वैचारिक मेजवानीचा आनंद घेतला. प्रा. डॉ. काटकर यांनी अध्यक्षीय भाषणातून ग्रंथ चळवळीवरही भाष्य केले. जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांनी आभार मानले.
ग्रंथ चळवळीला मिळाली ऊर्जा
ग्रंथोत्सवाच्या समारोपीय सत्रात सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. डी. शेंडे यांचे व्याख्यान झाले. माणसाला शारीरिक व मानसिक भुक असते. ही भुक राबविण्यासाठी पुस्तके उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक राय, मुरलीमनोहर व्यास, प्रा. डॉ. अनिल काटकर उपस्थित होते. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या संकल्पनेतून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाचन चळवळीवर आधारीत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सर्वच उपक्रमांनी वाचकांना नवीन प्रेरणा दिली. वाचनालय चालविणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्यांसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त शेंडे यांचे व्याख्यान उपयुक्त ठरले. ग्रंथालय संस्थांची नोंदणी कशी करावी, कार्यकारी मंडळात परिवर्तन कसे करावे, हिशेब पत्रके तयार करताना कोणती काळजी घ्यावी, यावर त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.