बल्लारपूर तालुक्यात सात ग्रामपंचायतींवर महिलाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:51 AM2021-02-06T04:51:32+5:302021-02-06T04:51:32+5:30
मानोऱ्यात मात्र सदस्यांच्या पळवापळवीचे राजकारण झाले असून सेनेच्या सहकार्याने भाजपच्या दुसऱ्या गटाचा सरपंच बसण्याची शक्यता आहे. तालुक्यात विसापूर, नांदगाव ...
मानोऱ्यात मात्र सदस्यांच्या पळवापळवीचे राजकारण झाले असून सेनेच्या सहकार्याने भाजपच्या दुसऱ्या गटाचा सरपंच बसण्याची शक्यता आहे.
तालुक्यात विसापूर, नांदगाव पोडे, हडस्ती, मानोरा, किन्ही, आमडी, कळमना येथे महिला सरपंच पदाची निवडणूक आज होत आहे तर पळसगाव, कोर्टी मक्ता, गिलीबिली या ग्रामपंचायतीत सरपंचपद राखीव नसल्यामुळे येथे स्त्री किंवा पुरुषामधून गुप्त मतदान किंवा हात वर करून मतदान घेऊन सरपंच ठरविण्यात येईल.
बॉक्स
मानोरात पळवापळवी
सरपंच पदाच्या आरक्षणाची घोषणा झाल्यापासून मानोरा येथे मात्र भाजपच्या दोन गटांमध्ये चढाओढ सुरू झाली. नऊ सदस्यीय मानोरा ग्रामपंचायतींमध्ये सात भाजपचे तर दोन सेनेचे सदस्य निवडून आले आहेत. यामुळे एका गटाने सेनेचा सदस्य पळविला तर टिकले गटाने सेनेचा एक सदस्य हाताशी धरला. यामुळे टिकले गटाकडे पाच सदस्य असल्यामुळे त्यांचाच सरपंच बसण्याची शक्यता आहे. गट कोणाचाही असला तरी सत्ता मात्र भाजपचीच राहणार आहे.
= मंगल जीवने