मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:06 AM2017-09-30T00:06:47+5:302017-09-30T00:06:56+5:30
शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो. मात्र चिमूर तालुक्यातील विहीरगाव साजा क्रमांक ३७ येथील भूमापन क्रमांक २१८ मधील ०.४७ हे. आर. व ०.५३ हेक्टर आर जमिनीचे मालक नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या नावाने वडीलोपार्जीत शेती होती. मात्र महसूल विभागातील खातोडा (वडसी) येथील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सातबारामध्ये हेराफेरी करुन मुख्य शेतमालक नांगीबाई मेश्राम यांचे त्यांच्या सातबारावरील नाव खोडून मालमत्तेमधून बेदखल केल्याचा प्रकार पत्रकार परिषेदतून शिवसेना नेते विलास डांगे व वारसदार शिवशंकर बळीराम मेश्राम, सुनील हरिदास मेश्राम रा. खातोडा यांनी उघडकीस आणला आहे.
चिमूर तहसील अंतर्गत येणाºया खातोडा (वडसी) येथील नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या मालकीची भूमापन क्रमांक २१८, साजा क्रमांक ३७ मध्ये साडेचार एकर जमीन होती. मात्र त्यांना मुलबाळ किंवा वारस नसल्याने त्यांनी त्यांचा नातू मसाराम विश्नुदास मेश्राम व पुतणे हरिदास बळीराम मेश्राम यांच्या नावाने स्थावर मालमत्तेचे मृत्यूपत्र करुन ती शेती या दोघांच्या नावाने करुन दिली. त्यामध्ये या दोघांच्या वाटणीला सव्वा दोन एकर जमीन आली. काही कालावधीनंतर नांगीबाई यांचा मृत्यू झाला. हे दोघेही आपसी वाटणीतून शेती करीत होते. मात्र अचानक २०१६ ला या सातबाºयावर खातोडा येथील तलाठी व मंडळ निरीक्षक यांनी मुख्य शेतजमिनीचे मालक नांगीबाई यांचे नाव सातबारावरुन कमी करुन या सातबाºयावर प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांची नोंद करुन मुख्य मालकालाच त्यांच्या स्थावर मालकीवरुन बेदखल केले, असा आरोप शिवशंकर मेश्राम व सुनिल मेश्राम यांनी केला आहे.
याबाबत सुनील मेश्राम यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. त्यात भूमापन क्रमांक ९१, १४८, व २०३ च्या सातबाराच्या अभिलेखागारात फेरफार पंजीची पाहणी केली असता या भूमापन क्रमांकात कुठल्याही प्रकारची फेरफार केली नसल्याची माहिती माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी ३१ आॅगस्ट २०१६ च्या पत्रातून दिली आहे. महसूल विभागात फेरफारची नोंद नसताना या सातबारामध्ये फेरफार कुणी केली व मुख्य मालकाला स्थावर मालमत्तेतून बेदखल कुणी केले, असा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन फेरफार करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करुन फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी शिवसेना नेते विलास डांगे व अन्यायग्रस्त शेतकरी शिवशंकर मेश्राम, सुनील मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतनू केली आहे.
नुकसान भरपाईपासूनही वंचित
मुख्य सातबारामध्ये नाव कमी करुन प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांच्या नावाने सातबारा असल्याने शासनाची नुकसान भरपाई त्यांना मिळते व मुख्य हक्कदार वंचित राहत आहेत. याच सातबारावर बँक आॅफ इंडिया शाखा नेरी येथून ९० हजार कर्ज घेतले आहे.