क्रांतीनगरीतील मुख्य मार्ग घेणार मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:11 AM2018-04-13T00:11:59+5:302018-04-13T00:11:59+5:30

The main path to the revolution will be breathing freely | क्रांतीनगरीतील मुख्य मार्ग घेणार मोकळा श्वास

क्रांतीनगरीतील मुख्य मार्ग घेणार मोकळा श्वास

Next
ठळक मुद्देपालिकेचा करार : कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरणार आठवडी बाजार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : चिमूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मोठे वाहन तसेच बाजारात येणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
चिमूर-वरोरा मुख्य मार्गावर भरणारा आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत भरविण्याविषयी नगर परिषदेत ठराव घेण्यात आला. त्यावर बाजार समितीने सहमती दर्शवली. पालिकेच्या मासिक सभेत काही अटी शर्तीसह बाजार भरविण्यास सहमती दर्शविण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे.
चिमूर नगर परिषद स्थापन होण्यापुर्वीपासून आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत आहे. ग्रामपंचायत काळात बाजार तलावात भरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे पुन्हा बाजार मुख्य रस्त्यावरच भरविण्यात आला. यामुळे रहदारीस होणाºया अडथळ्यामुळे तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पालिकेने सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत बाजार भविण्याविषयी एक मताने ठराव पारित केला. हा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला. बाजार समितीनेही अनुकुलता दर्शवली व तसे पत्र पालिकेला दिले. या पत्रावर १० एप्रिलला झालेल्या मासिक सभेत चर्चा करून करार करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.

फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
चिमूर शहराचे नागरिकीकरण झाले असून लोकसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून मुख्य रस्त्याला चौपदरी करण्यात येवून फुटपाथ व नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र फुटपाथवर अतिक्रमण वाढल्याने सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.

या आहेत अटी व शर्ती
सभेतील निर्णयाप्रमाणे उपलब्ध केलेल्या जागेसाठी भाडे तत्वावर दरमहा ३० हजार रुपये द्यावे, मूत्रिघर, वीज, पिण्याचे पाणी व स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेची राहील, समितीने बाजाराकरिता जागा समतल करून द्यावे, किमान दोन वर्षांचा करार करण्यात येईल, मात्र भाडे दरमहा देण्यात येईल, समितीने तयार करून दिलेल्या खड्यातच कचºयाची विल्हेवाट लावली जावी. बाजाराचा कर नगर परिषदेने ठरविलेला ठेकेदारच वसूल करेल, या अटींचा समावेश करारात आहे.

Web Title: The main path to the revolution will be breathing freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.