मजीप्राचे अभियंते-कर्मचारी बेमुदत संपावर

By admin | Published: March 7, 2017 12:40 AM2017-03-07T00:40:22+5:302017-03-07T00:40:22+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अभियंता व कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. मजीप्राच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी धरणे धरले आहे.

Majeed's engineers-staff unrestrained strike | मजीप्राचे अभियंते-कर्मचारी बेमुदत संपावर

मजीप्राचे अभियंते-कर्मचारी बेमुदत संपावर

Next

कार्यालयासमोर धरणे : चंद्रपूर जिल्ह्यात दोन कोटींचा प्रश्न
चंद्रपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अभियंता व कर्मचारी सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहे. मजीप्राच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी धरणे धरले आहे. दिलेल्या आश्वासनाला १३ महिने पूर्ण होऊनही मंत्रिमंडळ बैठकीतील टीपण चर्चेला न घेण्यात आल्याने जीवन प्राधिकरणातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर ठोस निर्णय होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय मजीप्रा संयुक्त संघटना संघर्ष समितीने घेतला आहे.
जीवन प्राधिकरणाचे विविध शासकीय आणि निमशासकीय खात्यांकडे पाणीपुरवठ्यापोटी मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ही शासकीय कार्यालयाने आणि संस्था देयक अदा करीत नसल्याने मजीप्राचा खर्च वाढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वेतन व भत्त्यांवर सुमारे साडेतीन कोटींचा खर्च आहे. तर वसुली मात्र केवळ दीड कोटी रुपये होत आहे. त्यामुळे मजीप्राचा डोलारा सांभाळणे दिवसेंदिवस कठिण जात आहे. अशीच स्थिती संपूर्ण राज्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मजीप्रामध्ये कार्यरत अभियंते आणि कर्मचारी आपापल्या संघटनांच्या माध्यमातून शासनाला अवगत करीत आहेत. ही संस्था शासनाने ताब्यात घेऊन कर्मचाऱ्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनाची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी करीत आहेत.
मजीप्राच्या अधिनियम कलम २७ मध्ये शक्य असेल तर प्राधिकरण राज्य शासनाकडून अनुदान किंवा अर्थसहाय्याची रक्कम घेतल्यानंतर या अधिनियमातील आपली कार्य तोट्यात चालविणार नाही आणि कलम २८मध्ये राज्य शासनास त्याबाबत योग्यरीतीने विनियोजन करून शासन निर्धारित करील अशा अटी व शर्तीवर प्राधिकरणाला वेळोवेळी अनुदाने किंवा अर्थसहाय्य देता येईल, असे म्हटले आहे. तरीही राज्य शासन आर्थिक सहाय्य देण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही.
मजीप्राच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनाचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी डिसेंबर-२०१५मध्ये सर्व संघटनांनी एकत्रित आंदोलन केले होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ८ डिसेंबर २०१५ रोजी तीन महिन्यांत हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे डिसेंबर-२०१५मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांना तत्कालीन पाणीपुरवठा मंत्र्यांनी तीन महिन्यात कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला १३ महिने झाल्यानंतरही मंत्रिमंडळाच्या बैठकीतील टीपण चर्चेला घेण्यात आले नाही. परिणामी हा प्रश्न चिघळला आहे. आता मजीप्रातील सर्व संघटनांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.संयुक्त संघटना संघर्ष समितीने चंद्रपूर येथील मजीप्राच्या कार्यालयासमोर मंडप टाकून आंदोलन सुरू केले आहे. त्यात मजीप्रातील सर्व अभियंते व कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाचे नेतृत्त्व संघर्ष समितीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आनंद भालाधरे करीत आहेत. आंदोलनात उपअभियंता पी. जी. घुटके, शाखा अभियंता आर. जी. गुरूमुखी, उपअभियंता एस. ए. पाटील, शाखा अभियंता बाराहाते आदींसह सर्व कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होते. (प्रतिनिधी)

वेतन-भत्त्याचे दायित्व स्वीकारावे
पिण्याच्या पाण्याची मूलभूत मानवी गरज भागविण्याकरिता शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही अंगीकृत संस्था तयार केली आहे. त्याद्वारे शासनाच्या विविध कार्यक्रम आणि योजनांचे नियोजन व नियमन करण्यात येते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी आणि ही संस्था सुरळीत चालावी, याकरिता जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतनाचे दायित्व शासनाने स्वीकारण्याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Web Title: Majeed's engineers-staff unrestrained strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.