जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे : हंसराज अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:31 AM2021-04-28T04:31:05+5:302021-04-28T04:31:05+5:30

जिल्ह्यातील सिमेंट उत्पादक कंपन्या अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी सिमेंट, दालमिया भारत सिमेंट, माणिकगढ सिमेंट व पॉवर उत्पादक कंपन्या ...

Major industries in the district should set up oxygen plants: Hansraj Ahir | जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे : हंसराज अहीर

जिल्ह्यातील प्रमुख उद्योगांनी ऑक्सिजन प्लांट उभारावे : हंसराज अहीर

Next

जिल्ह्यातील सिमेंट उत्पादक कंपन्या अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, एसीसी सिमेंट, दालमिया भारत सिमेंट, माणिकगढ सिमेंट व पॉवर उत्पादक कंपन्या धारिवाल, वर्धा पॉवर, जीएमआर व अन्य उत्पादक कंपन्या गोपाणी आयरन, लॉयड्स मेटल, चमन मेटॅलिक्स व चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट तसेच चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन या संपूर्ण उद्योगाने जिल्ह्यातील कोरोना संकट पाहता आपल्या विशेष फंडातून आपापले स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट उभारावे जेणेकरून जिल्ह्याकरिता ऑक्सिजनची गरज पूर्ण होईल. आपल्या जिल्ह्यातील जनतेसाठी एक पाऊल पुढे करून मदतीला यावे, असेही हंसराज अहिर यांनी म्हटले आहे. तसेच उद्योगांनी आपापल्या उद्योग परिसरातील गावात, तालुक्यात कोरोना केअर सेंटरची उभारणी सीएसआर फंडातून करावी यातून नागरिकांची सेवासुद्धा होईल, असे पत्र हंसराज अहिर यांनी सर्व उद्योगांना दिले आहे. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांना वेकोलिचे सीएमडी यांच्याशी झालेल्या चर्चेत वेकोलिने ३ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Major industries in the district should set up oxygen plants: Hansraj Ahir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.