लागवड पद्धतीत बदल करून उत्पन्न घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:22 PM2018-10-27T22:22:40+5:302018-10-27T22:23:03+5:30

एसआरटी या शास्त्रसिद्ध पद्धतीचा वापर करून पीक लागवड करुन कमी लागवड खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचे आवाहन एसआरटी पीक लागवडीचे प्रसारक अनिल निवळकर यांनी केले.

Make changes by changing the method of planting | लागवड पद्धतीत बदल करून उत्पन्न घ्या

लागवड पद्धतीत बदल करून उत्पन्न घ्या

Next
ठळक मुद्देअनिल निवळकर : एसआरटी पीक लागवड पद्धतीवर चंदनखेडा येथे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एसआरटी या शास्त्रसिद्ध पद्धतीचा वापर करून पीक लागवड करुन कमी लागवड खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचे आवाहन एसआरटी पीक लागवडीचे प्रसारक अनिल निवळकर यांनी केले.
संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे गुरुवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात एसआरटी पिक पद्धतीवर कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते. मार्गदर्शन करताना निवळकर पुढे म्हणाले, एसआरटी पद्धत म्हणजे थोडक्यात गादी वाफा पद्धत आहे. यात सुरुवातीला गादी वाफे करण्याकरिता खर्च आहे. परंतु, त्यानंतर किमान २० वर्षे शेताची नांगरणी, चिखलणी करावी लागणार नाही. बियाणे लागवडीकरिता सोप्या पद्धतीचे विशिष्ट यंत्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे मजूर खर्चात बचत होणार आहे. खते व बियाणे यांच्या खर्चामध्ये किमान अर्धी बचत होते असे ते म्हणाले.
आठ वर्षापासून रायगड, कोकण भागात धान व अन्य पिकांसाठी एसआरटी पद्धतीची यशस्वी लागवड करीत शेतकरी कमी लागवड खर्चात जास्त उत्पादन घेत आहेत. लागवडीचे प्रयोग भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथील काही शेतकऱ्यांनी केले असून त्यात त्यांना यश आल्याचे निवळकर यांनी सांगितले. धानपिकांसोबतच कापूस, तूर, चणा पिकांकरिताही पद्धत लाभदायक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला एसएओ पाटील, नागदेवे, देशपांडे, मांडवगडे व सरपंच गायत्री बोसर यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Make changes by changing the method of planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.