दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:06 AM2019-06-13T01:06:51+5:302019-06-13T01:07:26+5:30

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल.

To make a district of Divya's facility | दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार

दिव्यांगांसाठीचा सुविधायुक्त जिल्हा बनवणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दुसऱ्या टप्प्यात पुन्हा २०० स्वयंचलित सायकलींचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात दिव्यांगांना विशेष दर्जा दिला आहे. जिल्ह्यामध्ये शेवटच्या पात्र दिव्यांगाला स्वयंचलित तीन चाकी सायकल देईपर्यंत ही योजना सुरू राहील. याशिवाय अंध दिव्यांगांना विशेष संगणक वितरित करण्यात येईल. दिव्यांगांच्या संदर्भातील सर्व योजनांची अंमलबजावणी योग्यपद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात येत असून प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांच्या स्वप्नातील दिव्यांगासंदर्भातील सर्व उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात २०० दिव्यांगांना स्वयंचलित तीनचाकी सायकल वाटप बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ना. मुनगंटीवार बोलत होते. दहा वर्षांपूर्वी याच सभागृहात दिव्यांगांना तीनचाकी सायकलींचे वितरण केल्याची आठवणही यावेळी त्यांना झाली.
व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिष शर्मा, जि. प. समाज कल्याण सभापती व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सभापती राहुल पावडे, वनिता काकडे, तुषार सोम, दशरथ ठाकूर, वंदना पिंपळशेंडे, डॉ. मंगेश गुलवाडे, हिरामन खोब्रागडे विराजमान होते.
यावेळी दिव्यांगांसाठी नियमितपणे काम करणारे निलेश पाझारे व कल्पना शेंडे या दोघांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांचा सरकारी नोकरीतील टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यांमध्ये मिशन सेवा अभियान सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये दर्जदार अभ्यासिका निर्माण करण्याच्या आपल्या घोषणेचा पुनरुच्चार केला. चंद्रपूरमध्ये ज्युबिली हायस्कूल, बाबा आमटे अभ्यासिका यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ज्ञानार्जन करत असल्याचे समाधान पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांना मिशन सेवा अंतर्गत पुस्तकांच्या संचाचे देखील वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी केले.
यावेळी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांनी जिल्ह्यामध्ये अतिशय प्रभावीपणे जिल्हा परिषदेमार्फत ही योजना राबविण्यात येईल, असे अभिवचन दिले. आमदार नाना शामकुळे यांनी चंद्रपूरमध्ये सर्व दिव्यांगांना हा लाभ मिळणार असल्याचे सांगितले. जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे दिव्यांगासंदर्भात देवदूताचे काम करीत आहे. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात स्नेहल कन्नमवार, प्रिया पारखी, अश्विनी वाळके, भावना आत्राम, पूजा धोटे, ललिता चव्हाण, सुरज झाडे, मुन्ना खोब्रागडे, मारूबाई कोटनाके, वृंदा राजूरकर, दर्शना चाफले, सतीश कोलते, वृंदा थावरे आदींना पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
एक हजार सायकल वाटपाचे उद्दीष्ट
जि.प. समाज कल्याण विभागामार्फत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अंतर्गत प्राप्त निधीतून अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात एक हजार सायकलीचे वितरण करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी मूल येथे दिव्यांगांना २०० स्वयंचलीत सायकलींचे वाटप करण्यात आले होते. आज पुढील टप्प्यात आणखी दोनशे सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेवटचा दिव्यांग या योजनेचा लाभार्थी, होईपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे, असे ना. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. या तीन चाकी सायकलच्या बॅटरी संदर्भात अडचण असल्यास जि.प. मार्फत ती सोडवून घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अंध दिव्यांगांना मिळणार विशेष संगणक
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिव्यांगांच्या संदर्भात अतिशय जागृकतेने काम करत असून देशात ज्या ज्या ठिकाणी दिव्यांगांना संदर्भात जे काही चांगले सुरू असेल ते सर्व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केले जाईल. कुठेतरी असेच आपण स्वयंचलित सायकल बघितली होती. आपल्या जिल्ह्यातही याचे वितरण करताना आनंद होत आहे. जिल्ह्यातील अंध दिव्यांगांना देखील अशाच पद्धतीची मदत करण्याची तयारी असून त्यांच्या अतिशय उपयोगी ठरणाऱ्या विशेष संगणकांचे वाटप येत्या काळामध्ये आपण अंधांना करू, अशी घोषणा ना. मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

गडचिरोलीतील दिव्यांगांनाही मिळणार योजनांचा लाभ
एका दिव्यांग मुलीने तिच्यापेक्षा अधिक आवश्यकता असणाºया गडचिरोली जिल्ह्याच्या दिव्यांग मुलीला सायकल देणार असल्याची घोषणा केली. तिच्या मनाच्या या मोठेपणाचे कौतुक करत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी गडचिरोली जिल्हा वेगळा नसून त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना ही योजना तयार करायचे सांगितले जाईल. गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांना देखील स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वितरण करण्याची योजना बनविले जाईल, अशी घोषणा केली.

दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्देश
जिल्हा परिषद व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आता पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र यामधून कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी. दिव्यांगांसाठी रोजगारासोबतच घरांच्या योजनेमध्ये देखील प्राधान्य देण्यात यावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Web Title: To make a district of Divya's facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.