शासकीय योजनांचा लाभ घेत आर्थिक प्रगती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:13 PM2018-06-13T23:13:54+5:302018-06-13T23:14:06+5:30
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील नक्षलगस्त भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील संवेदनशील लाठी व धाबा परिसरातही योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आक्सापूर : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील नक्षलगस्त भागात विकासाच्या अनेक योजना सुरू आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील संवेदनशील लाठी व धाबा परिसरातही योजनांची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती करावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले. रविवारी या परिसराचा दौरा केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर गावात सभा आयोजित करण्यात आली होती. घरकुल योजनेच्या यादीमध्ये ज्या पात्र लाभार्थ्यांची नावे नव्हते, अशा गरजू लाभार्थ्यांची नावे ‘ड’ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, प्रत्येक गरजू व पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुलचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांची नावे यादीमध्ये नाहीत. त्यांनासुद्धा घरकुलचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन देण्यात येईल. शेतकरी कर्ज माफीची समस्या लवकर सोडवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. सोनापूर-टोमटा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करून शेतात पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासनही ना. अहीर यांनी दिले. याप्रसंगी अहीर यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्राला बालकांना खेळासाठी विविध प्रकारचे साहित्य वितरीत करण्यात आले.
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव, लाठी, सोनापूर देशपांडे व धाबा गावांना भेट देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रंगी राजुरा भाजपाचे खुशाल बोंडे, बबन निकोडे, पं. स. सभापती दीपक सातपुते, जि. प. सदस्य वैष्णवी बोडलावार, पं. स. उपसभापती मनीष वासमवार, गोंडपिपरीचे नगराध्यक्ष संजय झाडे, तहसीलदार सोनाली मेटकरी आदी उपस्थित होते.