पुस्तक वाचनातून भविष्य घडवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:33 PM2018-12-15T22:33:10+5:302018-12-15T22:33:33+5:30
पुस्तके गुरू आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनातून भविष्य घडवाव. तसेच संगणक प्रशिक्षणातून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पुस्तके गुरू आहेत. त्यामुळे पुस्तक वाचनातून भविष्य घडवाव. तसेच संगणक प्रशिक्षणातून प्रगती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले.
आयसीआयसी बँक सीएसआर निधीतून जिल्हा कारागृहात बंदिवानासाठी अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण केंद्र व ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी बंदिवानांमध्ये सुधारणा व पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी यांच्या पुढाकराने जिल्हा कारागृहात आयसीआयआय बँकेच्या वतीने १० संगणक, एक उर्ध्व प्रक्षेपक, ग्रंथालयासाठी ३८० पुस्तके सीएसआर निधीतून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजली घोटेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य न्यायदंडाधिकारी खोत, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, कार्यकारी अभियंता जयस्वाल पोलीस उप-अधीक्षक इंगवले, कारागृह अधीक्षक वैभव आत्राम, मुख्य विभागीय बँक व्यवस्थापक विवेक पत्की, बँकेचे व्यवस्थापक विवेक चौधरी, सहायक व्यवस्थापक वैभव माकोडे, साधना केकतपुरे, तुरुंगाधिकारी सुनील वानखडे, तुरुंगाधिकारी विठ्ठल पवार, तुरुंग शिक्षक ललित मुंडे, सुभेदार देवाजी फलके, शिवराम चवळे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभिविक्षिक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीमध्ये बंदी सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलण्यावर जिल्हाधिकारी खेमणार यांनी भर दिला. तसेच बंदी हे चार भिंतीच्या आत राहत असल्याने त्यांना प्राधान्याने आरोग्य सेवा, आहार, शिक्षण, मुलभूत सोई-सुविधा, कायदेविषयक सहाय, नियमित न्यायालय पेशी आदीबाबत तातडीने व उचित कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश शासकीय विभागांना दिले. उपस्थितांचे आभार कारागृह अधीक्षक वैभव आत्राम यांनी मानले.