जीवनात ध्येय निश्चित करावे - भांगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:14 AM2018-02-09T00:14:22+5:302018-02-09T00:14:46+5:30
जीवनात एकदा ध्येय निश्चित केले. आणि त्या दिशेने जिद्दीने कार्य केल्यास, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुणीही रोखू शकत नाही, तरुणांनी जीवनात ध्येय निश्चित करावे, असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
चिमूर : जीवनात एकदा ध्येय निश्चित केले. आणि त्या दिशेने जिद्दीने कार्य केल्यास, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास कुणीही रोखू शकत नाही, तरुणांनी जीवनात ध्येय निश्चित करावे, असे आवाहन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.
चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड तालुक्यातील तळोधी बाळापूर येथील साई मंदिरात स्वप्नझेप करियर पॉइंटतर्फे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या ८० प्रशिक्षणार्थ्यांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडियातर्फे रनिंग बुटचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे जेष्ट नेते वसंत वारजूकर, चिमूर क्षेत्र विधानसभा विस्तारक हितेश सूचक, नागभीड कृषी उत्पन्न बाजार सामितीचे अध्यक्ष आवेश पठाण, भाजपा नागभीड तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, जगदीश शेडमाके, सिंदेवाही तालुका भाजप अध्यक्ष राजू बोरकर, तळोधीचे सरपंच राजू रामटेके, अशोक ताटकर, वंदना पराते, प्रकाश कुमरे, प्रशांत गायकवाड, भूपेश भाकरे, विशाल गोपाले, शैलेश आत्राम स्वप्नझेप करियर पॉइंटचे संतोष हंसकार, अनिकेत कपाले आदी उपस्थित होते.
यावेळी आ. भांगडिया पुढे, म्हणाले प्रशिक्षणातून आपल्या मतदार क्षेत्रातील युवक युवतींनी पोलीस विभागात भरती होण्यास मदत मिळणार आहे. तसेच युवकांना वाचणासाठी वाचनालय तयार करण्यास आपण सर्वोपरी मदत करणार असून तरुण तरुणींनी पोलीस विभागात भरती होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.