बांबू कारागीरांना निस्तार दरातून हिरवे बांबू उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:52 AM2021-03-13T04:52:00+5:302021-03-13T04:52:00+5:30
पोंभुर्णा : तालुक्यात बांबू कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा सूप, टोपली बनविण्याचा असून, त्या कामगारांना निस्तार ...
पोंभुर्णा : तालुक्यात बांबू कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय हा सूप, टोपली बनविण्याचा असून, त्या कामगारांना निस्तार दराने बांबू पोंभुर्णा डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी बांबू कामगारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभुर्णा डेपोवर हिरवा बांबू उपलब्ध नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर संकट उभे ठाकले आहे. बांबू व्यवसायात पोंभुर्णा तालुक्यातील शेकडो कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बांबूच्या वस्तू बनवून ते विकून ही कुटुंबं आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु पोंभुर्णा डेपोमध्ये हिरवा बांबू नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पोंभुर्णा डेपोमध्ये हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी बुरूड कामगारांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना चेतन बुरेवार, अशोक पद्मगीरीवार, शरद पद्मगीरीवार, अविनाश पद्मगीरीवार, सुनीता पद्मगीरीवार, विलास बुरेवार, कवडू बुरेवार, उषा वासमवार, विजय तुराटे, सखाराम तुराटे, शांताबाई तुराटे, मीनाबाई कंदिकरेवार, लक्ष्मी तुराटे, सुलोचना जवादे आदी उपस्थित होते.