गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:55 PM2019-01-28T22:55:37+5:302019-01-28T22:56:05+5:30

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केली. प्रजासत्ताकदिनी पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, सभागृहाच्या नुतनीकरणाचे लोकार्पण तसेच २ कोटी किमतीच्या सिमेंट रस्स्ता भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

Make horticultural areas immediately | गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करा

गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करा

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे केली. प्रजासत्ताकदिनी पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, सभागृहाच्या नुतनीकरणाचे लोकार्पण तसेच २ कोटी किमतीच्या सिमेंट रस्स्ता भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पोंभूर्णाच्या नगराध्यक्ष श्वेता वनकर, सभापती अलका आत्राम, गजानन गोरंटीवार, विनोद देशमुख, रजिया कुरेशी, ग्रंथालय संघाचे अनिल बोरगमवार उपस्थित होते. ना. मुनगंटीवावर म्हणाले, बल्लारपूर मतदारसंघ हा १०० टक्के गॅसयुक्त, आरोयुक्त आदी सर्व अंगणवाड्या आयएसओ मानांकन धारक व्हाव्यात. पोंभुर्णा येथील युवकांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन नियमित मिळावे. जिल्ह्याचा सरकारी नोकरीतील टक्का वाढविताना पोंभूर्णासारख्या तालुक्यातील युवकांची देखील यामध्ये वर्णी लागावी, यासाठी श्यामाप्रसाद वाचनालयाची सुरुवात आपण या करत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध विषयांच्या पुस्तकांसोबतच स्पर्धापरीक्षांना उपयुक्त ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. सोबतच कॉलेजच्या प्रत्येक वर्षाची पुस्तके याठिकाणी उपलब्ध असावीत. ज्यामुळे गरीब व सुविधा नसलेल्या कुटुंबातील मुलांना स्नातक व स्नातकोत्तर शिक्षण या वाचनालयांमध्ये अभ्यास करून करता यावे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
टाटा ट्रस्टच्या मदतीने उन्नत शेती
पोंभूर्णा तालुक्यांमध्ये चार वर्षांमध्ये झालेल्या विकासकामांची माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. पोंभुर्णा एमआयडीसीला लवकरच सुरुवात होत असून या ठिकाणी पर्यावरण पूरक उद्योगाला निमंत्रित करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या मदतीने उन्नत शेती या कार्यक्रमाअंतर्गत समूह शेतीचे काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकतेच या ठिकाणी स्वीट क्रांतीला सुरुवात झाली असून पोंभूर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम यांच्या नेतृत्वात मध निर्मितीबाबत महिला बचत गटांना स्वयंपूर्ण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय कापडी पिशव्या, अगरबत्ती क्लस्टर निर्माण करणे, टूथपिक उद्योगाला चालना देणे, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत बंधारे निर्माण करणे आदी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी काम सुरू असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
स्वच्छता अभियानात तीन शहर पुढे
स्वच्छ भारत अभियानामध्ये मतदारसंघातील मूल, पोंभूर्णा व बल्लारपूर या तीनही नगरपरिषदांचा अंतर्भाव असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या तीनही नगर परिषदा व नगरपालिकाच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांनी अतिशय उत्तम काम केले. भविष्यातही हे काम उत्तम सुरू ठेवून स्वच्छ भारत अभियानात नालौकिक कायम ठेवावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

Web Title: Make horticultural areas immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.