सुक्ष्म सिंचनात जिल्ह्याला विदर्भात प्रथम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:36 PM2018-12-30T22:36:00+5:302018-12-30T22:36:15+5:30
जिल्हा सुक्ष्म सिंचनामध्ये विदर्भात प्रथम आणण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कृषी विभागाला देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणाºया संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी सूक्ष्मसिंचन वाढविण्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा सुक्ष्म सिंचनामध्ये विदर्भात प्रथम आणण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील कृषी विभागाला देण्यात आले आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, शेतकऱ्यांच्या संदर्भात काम करणाºया संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांनी सूक्ष्मसिंचन वाढविण्यासाठी लक्ष घालावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांच्या उत्पन्नामध्ये दुप्पटीने वाढ व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर सुक्ष्म नियोजन केले जात आहे. शुक्रवारी कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी जिल्ह्यातील पीक पॅटर्न, सिंचनाची उपलब्धता, शेतकºयांचा कल, प्रचलीत पीक पद्धत व सिंचनाचा नव्याने होऊ शकणारा वापर याबाबतचा आढावा घेतला होता. या बैठकीतही सूक्ष्म सिंचनावर भर देण्याचे निश्चत करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचनामध्ये शेतकºयांची सुक्ष्म सिंचनाकडे कल कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या योजनेच्या प्रचाराकडे लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
शनिवारी संदर्भातील प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चित्ररथामार्फत गावागावात प्रचार करताना संबंधित तालुका कृषी अधिकाºयांनी देखील ही योजना यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी सिंचन व शेतीतील नवनवीन प्रयोगासाठी चांदा ते बांदा या योजनेमधून कृषी विभागाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. मात्र या योजनांना जनतेने प्रतिसाद दिल्याशिवाय यशस्वी होणार नाही. त्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांना या योजनेची माहिती व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त केली.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून प्रचार कायार्चा शुभारंभ केला. चित्ररथासोबत योजना पद्धतीचा सहभाग, अटी व शर्थी, याबाबतची माहिती देणारे पत्रक वाटले जाणार आहेत. चित्ररथाबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी दिली.