हॉलमार्किंग अनिवार्य केल्याने सोन्याचे व्यवहार होणार सोन्यासारखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 AM2021-06-22T04:19:41+5:302021-06-22T04:19:41+5:30
सर्व सोन्याच्या दुकानांमध्ये सोने आणि इतर दागिन्यांची खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. हे व्यवहार करताना दुकानदार कॅरेटोमीटरचा उपयोग करत नाहीत. ...
सर्व सोन्याच्या दुकानांमध्ये सोने आणि इतर दागिन्यांची खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. हे व्यवहार करताना दुकानदार कॅरेटोमीटरचा उपयोग करत नाहीत. कॅरेटोमीटर सोन्याची शुद्धता आणि परिमाण दर्शवत असतो. ग्राहकांजवळून सोने आणि इतर दागिने विकत घेताना दुकानदार डागच्या नावाखाली १० टक्के रक्कम कापून सोने विकत घेतात; पण जेव्हा हेच दुकानदार सोने किंवा इतर दागिने स्वत:च्या दुकानात विकतात तेव्हा सोने मात्र कसेही असो ते २४ कॅरेटच्या किमतीतच विकतात. दुकानात कॅरेटोमीटर नसल्यामुळे ग्राहकांना दुकानदारांवर डोळे बंद करून विश्वास ठेवून सोने व इतर दागिने विकत घ्यावे लागतात. येथेच ग्राहकांची फसवणूक होते. ही फसवणूक थांबविण्यासाठी सर्व ज्वेलरी दुकानात कॅरेटोमीटर लावणे तसेच सोन्याच्या व इतर दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे अनिवार्य असले पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी भारतीय मानक ब्यूरो दिल्ली यांच्याकडे १ ऑगस्ट २०१८ रोजी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ऍक्ट २०१६ अंतर्गत हॉलमार्किंग ऑफ गोल्ड ज्वेलरी ऑर्टिफॅक्टस ऑर्डर २०२० लागू केले आहे. १ जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांसोबत इतर सर्व वस्तूंवर हॉलमार्किंग अनिवार्य करणे आणि ज्वेलर्सनी हॉलमार्किंग सेंटरमध्ये स्वत:ची नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावतीने २०१८ पासून सतत पाठपुरावा केला. यासाठी तत्कालीन सचिव अविनाश जोशी, वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, पुरुषोत्तम मत्ते, शेखर घुमे, गुलाब लोणारे, गोपीचंद कांबळे, उत्तम घोसरे यांनी महत्त्वाची भूमिका वठविली, अशी माहिती अ.भा. ग्राहक पंचायत भद्रावतीचे सहसचिव प्रवीण चिमुरकर यांनी दिली.
===Photopath===
210621\img-20210620-wa0000.jpg
===Caption===
हॉल मार्क चिन्ह