पाणीपुरवठा योजनेच्या विहीर बांधकामात गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:28 AM2021-05-18T04:28:37+5:302021-05-18T04:28:37+5:30

राजुरा : जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील खनिज विकास निधीतून बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे अंदाजपत्रक वगळून बांधकाम करण्यात आले ...

Malpractice in construction of water supply scheme wells | पाणीपुरवठा योजनेच्या विहीर बांधकामात गैरव्यवहार

पाणीपुरवठा योजनेच्या विहीर बांधकामात गैरव्यवहार

Next

राजुरा : जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील खनिज विकास निधीतून बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीचे अंदाजपत्रक वगळून बांधकाम करण्यात आले आहे. या कामात गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जीवती तालुका संघटिका सिंधू परमेश्वर जाधव यांनी राज्याचे पाणीपुरवठ मंत्री व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सन २०१८-१९ या वर्षीच्या खनिज विकास निधीतून पल्लेझरी येथे पाणीपुरवठा योजनेसाठी विहीर मंजूर करण्यात आली होती. यासाठी २७ लाख ९९ हजार ६६७ रुपये एवढी रक्कम मंजूर झाली होती. या गावात पूर्वी पाणीपुरवठ्यासाठी एक विहीर होती; परंतु त्या विहिरीतील पाणी पिल्याने गावात मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी या विहिरीतील पाण्याची तपासणी केली असता, यात मोठ्या प्रमाणात फ्लोराइडचे प्रमाण मिळाले. शेवटी ही विहीर पाणी पिण्यास अयोग्य घोषित करून येथील पाणी वापरणे बंद करण्यात आले.

यानंतर खनिज विकास निधीतून नवीन विहीर बांधकामासाठी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार कार्यादेश देण्यात आला. मात्र, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून जुन्या फ्लोराइड असलेल्या विहिरीचा गाळ काढून आणि थोडे खोदून त्याच विहिरीचे अर्धवट राहिलेले बांधकाम केले. जुन्या विहिरीचे पाणी फ्लोराइडयुक्त असल्याने नवीन विहिरीची मागणी मंजूर होऊनही अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने जुन्याच विहिरीचा गाळ काढून तिला बांधकाम केल्याचा मुलामा दिला. वास्तविक खनिज विकास निधीतून नवीन जागेवर गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर बांधणे अपेक्षित होते; परंतु जुन्याच सदोष पाणी असलेल्या विहिरीची डागडुजी करण्यात आली आणि जनतेची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या जीवती तालुका संघटिका सिंधू जाधव आणि पल्लेझरी येथील ग्रामस्थांनी राज्याचे पाणीपुरवठामंत्री आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Malpractice in construction of water supply scheme wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.