अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 01:11 PM2022-04-23T13:11:36+5:302022-04-23T13:17:54+5:30

पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली व बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

man killed his neighbor with a shovel over small dispute | अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले

अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले

Next
ठळक मुद्देतीन आरोपींना पोलिसांनी केली अटकराजुरा तालुक्यातील पंचाळा येथील घटना

विरूर स्टेशन (चंद्रपूर) : शेजाऱ्याचा कुत्रा अंगणात आला, या क्षुल्लक कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. हा वाद विकोपाला जाताच एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर लोखंडी फावड्याच्या दांड्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पंचाळा येथे घडली.

गणेश मडावी (३५, रा. पंचाळा) असे मृताचे नाव आहे. गणेश मडावी हा ड्रायव्हरचे काम करून गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आपल्या घरी आला. आल्यावर त्यांनी स्वतःच्या घरातील पाळीव कुत्रे सोडले व आंघोळ करण्यासाठी गेला. ते पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली.

बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यात प्रभाकर भोंगळे यांनी गणेश मारोती मडावी यांचे दोन्ही हात पकडले व रोहित प्रभाकर भोंगळे याने फावड्याचा दांडा मडावी यांच्या डोक्यावर मारला. डोक्यावर जबर मार लागून रक्तबंबाळ झाल्याने गणेश मडावी यांना तेथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी प्रभाकर अर्जुन भोंगळे (५०), रोहित प्रभाकर भोंगळे (२१) आणि एक महिला (४५, सर्व रा. पंचाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, पोलीस हवालदार दिवाकर पवार, माणिक वाग्धरकर, विजय मुंडे करीत आहेत.

Web Title: man killed his neighbor with a shovel over small dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.