हत्या केली अन् दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; रक्ताने माखलेली दुचाकी सापडली अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 10:39 AM2022-06-10T10:39:16+5:302022-06-10T10:54:58+5:30

याप्रकरणी पडोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

man was killed and his body was thrown into a well over money dispute | हत्या केली अन् दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; रक्ताने माखलेली दुचाकी सापडली अन्..

हत्या केली अन् दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला; रक्ताने माखलेली दुचाकी सापडली अन्..

Next
ठळक मुद्देचंद्रपूर येथील धक्कादायक घटना

चंद्रपूर : येथे एका ३२ वर्षीय युवकाची लोखंडी रॉड डोक्यावर मारून हत्या केल्यानंतर मृतदेह लपविण्यासाठी आरोपींनी मृतदेहाला दगड बांधून विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी ७ जूनला दुपारी ३ च्या सुमारास उघडकीस आली.

प्रवीण विठ्ठल घिवे (३२) रा. मोरवा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पडोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. मृतक व आरोपींमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणवरून पडोली परिसरात वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी लोखंडी रॉडने प्रवीणच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर मृतदेह कुणालाही दिसू नये, यासाठी आरोपींनी पडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील भागात असलेल्या एका विहिरीत मृतदेहाला मोठा दगड बांधून फेकण्यात आले होते.

दरम्यान प्रवीण बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी पडोली पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पडोली पोलिसांनी तपासाला गती दिली असता, मृतकाची दुचाकी आढळून आली. दुचाकी रक्ताने माखलेली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून विहिरीत मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाला दगड बांधलेले असल्याने मृतदेह पाण्यावर तरगंत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी संशयावरून पडोली पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिकचा तपास पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Web Title: man was killed and his body was thrown into a well over money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.