श्रमदानातून माना टेकडी परिसर झाला स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:32 AM2021-09-14T04:32:52+5:302021-09-14T04:32:52+5:30

चंद्रपूर : येथील पठाणपुरा गेटबाहेरील माना टेकडी परिसरातील असलेले गणपती मंदिर, फुटबाॅल ग्राउंडच्या मागील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा ...

Mana hill area became clean through hard work | श्रमदानातून माना टेकडी परिसर झाला स्वच्छ

श्रमदानातून माना टेकडी परिसर झाला स्वच्छ

Next

चंद्रपूर : येथील पठाणपुरा गेटबाहेरील माना टेकडी परिसरातील असलेले गणपती मंदिर, फुटबाॅल ग्राउंडच्या मागील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा होता. यामुळे येथे जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या त्रास ओळखून येथील स्वराज फाउंडेशन, हिंदुराष्ट्रम ग्रुप, तसेच चांदागड ट्रेकर्सच्या सदस्यांनी श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली.

यावेळी परिसरातील कचरा गोळा केला. त्यामुळे येथे येणाऱ्यांना सुविधा झाली आहे. विशेष म्हणजे, स्वराज फाउंडेशन, हिंदुराष्ट्रम ग्रुप, तसेच चांदागट ट्रेकर्सच्या वतीने दर रविवारी विविध मंदिरे, तसेच सामाजिक स्थळांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवीत आहेत. श्रमदानासाठी देवानंद साखरकर, अश्विन मुसळे, स्वाती बोरडकर, नंदू लाभणे, हिमांशू दहेकर, चेतन पटेल, जतीन पटेल, प्रियांका पुनवटकर, गणेश मेश्राम, रोहित तुरकार, चैतन्य सदाफळे, राहुल अवताळे, रोहित वराडे, कार्तिक मुसळे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Mana hill area became clean through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.