मंगी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार - आ. सुभाष धोटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:24 AM2021-02-08T04:24:53+5:302021-02-08T04:24:53+5:30
राजुरा : भारतीय खेड्यांचे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. ग्रामीण संस्कृतीची जोपासना, संत परंपरेची शिकवण, आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर ...
राजुरा : भारतीय खेड्यांचे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. ग्रामीण संस्कृतीची जोपासना, संत परंपरेची शिकवण, आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या बाबींमुळे गावातील नागरिक आज बदलत्या परिस्थितीत अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत विकासाचे नवनवीन कीर्तिमान स्थापन करीत आहेत. मंगी गाव हे राजुरा तालुक्यातील अतिशय सुंदर आणि प्रयोगशील गाव म्हणून पुढे येत आहे. या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार, असे मत आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. ग्रामपंचायत मंगी (बु.) द्वारा आयोजित वाचनालय, व्यायामशाळा व फिरते आरोग्य पथक उद्घाटन व लाडूतुला कार्यक्रम प्रसंगी ते उपस्थित होते.
याप्रसंगी मौजा मंगी (बु.) ग्रामपंचायत येथील वाचनालय, व्यायामशाळा व फिरते आरोग्य पथक ओ.पी.डी.चे उद्घाटन आ. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मंगी बु. ग्रामस्थांच्या वतीने आ. धोटे यांचा नागरी सत्कार व लाडूतुला करण्यात आली. गावकऱ्यांनी अश्विन रायकुंडलीया, युनिट हेड, अंबुजा यांचाही नागरी सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अश्विन रायकुंडलीया होते. प्रमुख पाहुणे म्हणून संजीव राव, मुमताज जावेद, मंगेश गुरुनुले, रसिका पेंदोर, सुनंदा डोंगे, श्रीकांत कुंभारे, रंजन लांडे, भीमराव पुसाम आदी उपस्थित होते.